Saturday, March 25, 2023

ZOOM ला टक्कर देण्यासाठी WhatsApp मैदानार! एकाचवेळी ८ जणांना करता येणार व्हिडिओ काॅल

- Advertisement -

वृत्तसंस्था | कोरोनामुळे देशात सर्वत्र सध्या लाॅकडान पाळले जात आहे. ३ मे पर्यंत अनेकजण वर्क फ्रोम होम करत आहेत. अनेकजण यावेळी झूम अॅपचा वापर कार्यालयीन कामासाठी करताना दिसत आहेत. आता झूम अॅपला टक्कर देण्यासाठी व्हाॅट्सअॅप मैदानात उतरले आहे.

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) सतत आपल्या वापरकर्त्यांचा चॅटिंग अनुभव सुधारण्यासाठी नवनवीन फीचर्स जारी करत असतो. आता यावेळी व्हॉट्सअ‍ॅपने अँड्रॉइड आणि आयओएस बीटा व्हर्जनच्या वापरकर्त्यांसाठी एक अपडेट जारी केला आहे. या अपडेट अंतर्गत, एकाचवेळी 8 वापरकर्ते ग्रुपमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करू शकतील. चिनी टेक साइट वेब बीटा इन्फोच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती मिळाली.

- Advertisement -

वेब बीटा इन्फोच्या ट्विटनुसार व्हॉट्सअ‍ॅपच्या अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.20.132 आणि आयओएसच्या बीटा व्हर्जन 2.20.50.25 साठी एक अपडेट जारी करण्यात आला आहे. आता बीटा आवृत्तीवर 8 वापरकर्ते ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल करू शकतील. तथापि, स्टेबल व्हर्जनसाठी अद्याप हे अपडेट जारी झालेले नाही. अशी अपेक्षा केली जात आहे की लवकरच कंपनी हे अपडेट स्टेबल वापरकर्त्यांसाठी सादर करेल.

अहवालानुसार व्हॉट्सअ‍ॅप लवकरच हे अपडेट स्टेबल वापरकर्त्यांसाठी सादर करणार आहे. या अपडेट नुसार, 8 सदस्य एकाच वेळी व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल करण्यास सक्षम असतील. त्याच वेळी, हे गुगल डुओ आणि झूम अ‍ॅपला टक्कर देणार आहे.