‘राधे’शी पंगा पडणार भारी..! वॉट्सअप होणार कायमचं बंद; दिल्ली हायकोर्टाने दिले निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सलमान खानचा ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर अगदी काहीच तसंतमध्ये ऑनलाईन अन्य वेबसाईटवर फुकट पाहण्यासाठी उपलब्ध झाला होता. अर्थात ऑनलाईन लीक झाला होता. यामुळे चित्रपटाची पायरेटेड कॉपी अगदी व्हॉट्सअ‍ॅप व अन्य सोशल मीडिया माध्यमांवर सहजगत्या फिरू लागली. ‘झी ५’ने याविरोधात याचिका दाखल करीत हायकोर्टात धाव घेतली. यावर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने भाईजानच्या सिनेमाची पायरेटेड कॉपी विकणा-या युजर्सची सर्व्हिस कायमस्वरूपी बंद करण्याचे निर्देश व्हाट्सअ‍ॅपला दिले आहेत.

https://twitter.com/Vishal4SK/status/1397080690244550656

 

एअरटेल, जिओ, वोडाफोन या देशातील सर्व प्रमुख व आघाडीच्या टेलिकॉम ऑपरेटर सर्व्हिसेस आहेत. कोर्टाने यांनाही पायरसी करणा-या ग्राहकांची माहिती जमा करून देण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून झी५ या ग्राहकांविरूद्ध कायदेशीररित्या कारवाई करू शकेल. ‘राधे’ चित्रपटाची पायरेटेड कॉपी आणि विविध व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये सर्रास पसरवल्या जात आहेत, असा आरोप झी-५ कडून आपल्या याचिकेत नमूद करण्यात आला होता. यावर हायकोर्टाने उपरोक्त निर्देश दिले आहेत. त्यानंतर चित्रपट बेकायदेशीरपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यावर त्वरित बंदी आणण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

https://www.instagram.com/p/CPSTYWsDLud/?utm_source=ig_web_copy_link

ईदच्या निमित्ताने गेल्या १३ मे २०२१ रोजी सलमान खानचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट रिलीज झाला. मात्र यादरम्यान काही युजर्सने बेकायदेशीररित्या चित्रपटाची पायरसी केली. यामुळे सलमान खान चांगलाच संतापला होता. ‘राधे’ हा चित्रपट प्रेक्षकांनी योग्य प्लॅटफॉर्मवरच पहावा अशी विनंतीदेखील सलमानने आधीच केली होती. मात्र त्यानंतरही अनेकांनी बेकायदेशीररित्या काही वेबसाईटवर उपलब्ध असलेला चित्रपट पाहिल्याने सलमानचा पारा चढला. पायरसीचा भाग होऊ नका, नाहीतर सायबर सेल तुमच्यावर कारवाई करेल, तुम्ही अडचणीत याल, अशी ताकिदच त्याने युजर्सना दिली होती.

Leave a Comment