Whatsapp ची नवीन पाॅलिसी अशी आहे फायद्याची! पहा काय म्हणतायत सायबर एक्सपर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Whatsapp च्या नवीन पॉलिसीला घेऊन लोकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण आहे. सध्या आसपास सगळीकडे याचीच चर्चा सुरू असल्याचे दिसून येते. सोबतच व्हाट्सअपला पर्याय म्हणून काही मेसेंजर ॲप असे सिग्नल आणि टेलिग्राम यांचा वापर करण्याचे सल्लेही दिले जात आहेत. पण सायबर एक्सपोर्ट यांचे यावर वेगळेच मत आहे. दिल्ली पोलीस चे सायबर क्राईम एक्सपर्ट आणि इंडियन सायबर आर्मीचे चेअरमन किसलय चौधरी यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे.

चौधरी म्हणतात की, ‘Whatsapp चे नवीन पॉलिसी बद्दल उठवले जाणारे प्रश्न एकदम बरोबर आहेत. पण त्याचे पूर्ण उत्तरे माहिती असणे गरजेचे आहे. असे न झाल्यास लोकांमध्ये भीतीचे वातावरण कायम राहील. पण या नवीन पॉलिसीला घेऊन लोकांनी घाबरण्याचे अजिबात कारण नाही. जी लोक फेसबुक वापरतात ती सगळी माहिती फेसबुककडे पहिल्यांदाच आहे. ती यापुढे व्हाट्सअपच्या माध्यमातून फेसबुककडे येणार आहे. त्यामुळे एवढे जास्त घाबरण्याची गरज नाही’. चौधरी पुढे सांगतात की या पॉलिसीनंतर व्हाट्सअप हे फेसबुकसारखे होऊन जाईल. व्हाट्सअप आपल्याकडे डेटा त्याच प्रमाणात आणि तसेच पद्धतीने विकेल जसे आरोप यापूर्वी फेसबुकवर लागत आले आहेत. फेसबूक जवळही यूजरचे लोकेशन, त्यांची गॅलरी, त्यांचे फोन नंबर, फोनची माहिती, बँक खात्याची माहिती, सोबतच आपली वैयक्तिक माहिती सुद्धा दिलेली असते. व्हाट्सअपही जवळपास तसेच होईल. पण फेसबुक इतके Whatsapp हे पब्लिक होणार नाही

https://t.co/tKl0hHg2n0?amp=1

या नवीन पॉलिसी मुळे गुन्हे आणि पोलीस दलाला याचा मोठा फायदा होऊ शकेल. त्यामुळे अपराध्याच्या फोन मध्ये Whatsapp असेल तर त्या आरोपीला पकडणे सोपे होणार आहे. Whatsapp कॉल रेकॉर्ड होत नसल्यामुळे त्याचा फायदाही अनेक अपराध्यांनी उचलला. त्यामुळे पोलिसांना अपराध्यांना पकडणे शक्य होत नव्हते. यानंतर पोलिसांना ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी माहिती मिळू शकेल. सध्या तरी Whatsapp ने कॉलिंग आणि चॅट पूर्णपणे सुरक्षित राहील अशी ग्वाही दिली दिली आहे.

https://t.co/kuze4MHAGY?amp=1

https://t.co/Dz5hH4ytI3?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment