पोलिसांचा शोध सुरू : यवतेश्वर घाटात व्यापारी पडला की मित्रांनी ढकलला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

साताऱ्यातील यवतेश्वर घाटात दरीत पडलेल्या व्यापाऱ्यास वाचविण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे. मात्र, व्यापारी पार्टी करण्यासाठी गेला होता, तेव्हा तो स्वतः पडला कि मित्रांनी ढकलला यांचा शोध पोलिस घेत आहेत. यवतेश्वर येथील दरीतून सुशांत शामराव बोराटे (वय-38, रा. करंजे पेठ, सातारा) याला 15 ते 16 तासानंतर काढण्यात यश आले.

बुधवारी सकाळी काहीजणांना कांदा- बटाट्याचा व्यापारी असलेल्या सुशांत यवतेश्वरच्या दरीत पडल्याचे दिसून आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सातारा तालुका पोलीस अन् शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने अथक परिश्रम घेऊन त्याला 200 फुट खोल दरीतून जीवंत बाहेर काढले. मात्र, तो स्वतः दरीत पडला की त्याला त्याच्या मित्रांनी दरीत ढकलून दिले, याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फोनवरुन यवतेश्वरच्या दरीत एकजण जखमी अवस्थेत पडल्याबाबतचा निनावी फोन आला. या फोनवरुन सातारा तालुका पोलीस घटनास्थळी पोहचले. दरीत युवक दिसत असल्याने त्यापर्यंत पोहचून त्याला बाहेर काढणे गरजेचे होते. त्यामुळे शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला बोलवण्यात आले. रेस्क्यू टीमचे जवान त्याच्याजवळ पोहचले तर जखमी झालेला युवक वेदनेने तडफडत होता. त्याला जीवंत पाहून मदत कार्य वेगाने सुरु करुन त्याला दरीतून दुपारी बाहेर काढण्यात यश आले. त्याचा डावा पाय मोडला असून त्यास लगेच त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Leave a Comment