26/11 च्या भ्याड हल्लाने जेव्हा मुंबई हादरली! वाचा त्या काळरात्री नेमकं काय घडलं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 26 नोव्हेंबर 2008 ही तारीख आजही आपल्या लक्षात आहे. याच दिवशी 10 दशहतवाद्यांनी ताज हॉटेल, ट्रायडेंट हॉटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर भ्याड हल्ला केला होता. या घटनेने संपूर्ण मुंबईला हादरवून सोडले होते. यावर्षी या घटनेला 13 वर्षे पूर्ण होत आहेत. दहशतवाद्यांनी घडवलेल्या या हल्ल्यात 160 पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच, मुंबई पोलीस दलातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना वीरमरणं आले होते. या घटनेला इतकी वर्ष उलटून गेली तरी या हल्ल्यातील थरारक, वेदनादायी आणि कटू आठवणी आजही मनात घर करून राहिल्या आहेत.

या ठिकाणांना केलं होत टार्गेट

26/11 रोजी मुंबईतील अनेक ठिकाणी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. सलग चार दिवस झालेल्या या हल्ल्यात 160 हून अधिक लोक मारले गेले होते. तसेच, 300 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. 26 नोव्हेंबर रोजी च्या त्या रात्री झालेल्या गोळीबाराने संपूर्ण मुंबई हादरवून गेली होती. या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेल, ट्रायडेंट हॉटेल, एक हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन आणि ज्यू सेंटरला टारगेट केलं होतं. हा हल्ला एवढा मोठा असेल याचा स्वप्नातही कोणी विचार केला नव्हता.

9 दहशतवादी ठार

2008 साली मुंबईवर हल्ला करण्यासाठी दहा दहशतवादी पाकिस्तान मधून समुद्राच्या मार्गे मुंबईत आले होते. हे दहशतवादी दुसरे तिसरे कोणी नसून लष्कर-ए-तोयबा या संघटनेतील होते. त्यांनी, सुरुवातीला हॉटेल ताज, नरिमन हाऊस, हॉटेल ओबेरॉय आपल्या ताब्यात घेतले होते. यात त्यांनी ताज हॉटेलमध्ये 31 जणांचा जीव घेतला. तसेच, त्यांनी केलेल्या हल्ल्यात सर्वाधिक मृत्यु छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे झाले. त्यावेळी दहशतवाद्यांनी एक टॅक्सी बॉम्बने उडवून दिली होती. या हल्ल्यात पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 9 दहशतवादी ठार झाले. तर फक्त अजमल आमीर कसाब हा दहशतवादी जिवंत राहिला.

तुकाराम ओंबळेंमुळे कसाबला पकडण्यात यश

आमीर कसाब याला पकडण्यासाठी तुकाराम ओंबळे यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. तुकाराम ओंबळे यांच्यामुळेच कसाबला जिवंत पकडण्यात यश आले. मुंबई हल्ल्यात फक्त कसाब जिवंत सापडल्यामुळे त्याच्या फाशीची तीव्र मागणी करण्यात आली. अखेर 21 नोव्हेंबर 2012 रोजी कसाबला पुण्यातील येरवडा कारागृहात फासावर लटकविण्यात आले. महत्वाचे म्हणजे, मुंबईत घडलेल्या या भ्याड हल्ल्यात नागरिकांबरोबर दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे आणि मुंबई पोलिसांच्या अनेक अधिकाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. खरे तर, या हल्ल्यानंतर मुंबईचे चित्रच पालटून गेले. त्यामुळे 26/11 हा दिवस ब्लॅक डे म्हणून पाळला जातो.