ब्राम्हण समाजाचा नेता मुख्यमंत्री झाला, तेंव्हा आरक्षणाचे बोचके बाहेर काढले : आ. सदाभाऊ खोत यांचा आरोप 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | राजकारणामध्ये जे मराठे आहेत, ते प्रस्थापित सुभेदार आहेत. या सुभेदारांना गरीब मराठा समाजाच्या मुलांची प्रगती नको आहे, या सरदारांनीच गरीब मराठा समाजाला जाणीव पूर्वक आरक्षण दिले नाही. ब्राम्हण समाजाचा नेता मुख्यमंत्री झाला तेंव्हा यांनी आरक्षणाचे बोचके बाहेर काढले, अशी घणाघाती टीका माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. तसेच मराठा आरक्षणासाठी आणि आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी रयत क्रांती संघटनेतर्फे सोमवारी दहा मे रोजी माझे अंगण, माझे आरक्षण हे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आ. सदाभाऊ खोत म्हणाले, मराठा समाजाच्या सरदारांनी मराठा समाजाचे नुकसान केले. शिंदे, पाटील, चव्हाण, पवार या प्रस्थापितांनी लाभ घेतला. मात्र गरीब मराठा समाजाला आरक्षण दिले तर ते मोठे होतील या भीतीने ते आरक्षण देत नाहीत. त्यांनाच सर्वोच्च न्यायालयात मांडणी करता आली नाही.  हे १०० कोटींच्या वसुली आणि वाटणी मध्ये भांडत बसले आणि त्यांना भानच राहील नाही कि दिल्लीत मराठा आरक्षणवर तारीख आहे.

यावेळी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये आल्यानंतर मराठा आरक्षणाचा वानवा राज्यभर उभा राहिला. ५७ मूक मोर्चे निघाले. फडणवीस हे नेहमी सांगत होते कि आरक्षण द्यायचं आहे. परंतु पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पूजेला सुद्धा फडणवीसांना जाऊ दिले नाही. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आरक्षणाविषयी आक्रमक होती. सरकार सर्वोच्च नाययलायत मराठा समाज मागसेलला आहे हे ताकदीने मांडू शकले नाही. अनेक गरीब मराठा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत हे मांडू शकले नाहीत, वकिलांची फौज उभा केली नाही. चार ते पाच महिने न्यायालयात गेलेच नाहीत. तिघांची तिनी कडे तोंडे होती. दोन वर्षे तुम्ही मूग गिळून गप्प का बसला होता? याचा अर्थ गरीब मराठा समाजाला महाविकास आघाडी मधल्या सरदारांना आरक्षणच द्यायचं नाही. १७ वर्षात केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार होत तर का आरक्षण दिल नाही?

राजकारणामध्ये जे मराठे आहेत ते प्रस्थापित सुभेदार आहेत या सुभेदारांना गरीब मराठा समाजाच्या मुलांची प्रगती नको आहे, त्यांना भीतीने ग्रासलेल आहे. या सरदारांनी मराठा समाजाला जाणीव पूर्वक आरक्षण दिले नाही. ब्राम्हण समाजाचा नेता मुख्यमंत्री झाला तेंव्हा यांनी आरक्षणाचे बोचके बाहेर काढले. ज्या पद्धतीने फडणवीस यांना कोंडीत पकडले त्याच माणसाने आरक्षण दिले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हेच खरे जातीयवादी पक्ष आहेत. या सगळ्या राजकारणातल्या सरदारांनी जाणीवपूर्वक मराठा समाजाला मागास ठेवले आमच्यापेक्षा मोठे कोणी होता कामानये ही भावना होती. मराठा आरक्षण हे मराठा समाजाच्या सरदारांनीच घालवल. सरदारांना आराक्षणाची गरज नाही त्यांच्या दहा पिढया घरात बसून खातील एवढं सगळं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दया येते काही झाले तरी केंद्रकडे बोट दाखवतात. सगळंच केंद्राकडे दाखवत मग राज्यच केंद्राकडे द्या अशा शब्दात त्यांनी आघाडीच्या नेत्यांवर आ. सदाभाऊ खोत यांनी टीकास्त्र सोडले.

“आरक्षण बांधले काठीला, महाविकासआघाडी सरकार निघालं काशीला”

आरक्षण रद्दच्या निषेधार्थ तसेच आघाडी सरकारच्या कृत्य विरोधात दहा तारखेला सकाळी सात ते दोन पर्यंत माझे आंगण हेच रणांगण हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात “मराठांच्या पोरांचे आरक्षण बांधले काठीला, महाविकासआघाडी सरकार निघालं काशीला” अशी घोषणा असेल. कठीला दप्तर बांधून दारात उभा राहतील. हे सरकार काशीला जाण्याचं लायकीचा आहे. खंडणी गोळा करून सरकारचं झालं आहे. एकप्रकारे मराठा समाजाची सरदारांनी फसवणूक केली आहे. जो पर्यंत आरक्षण मिळत नाहीत तो पर्यंत सर्व सवलती सरकारनं द्याव्यात त्या साठी दहा हजार कोटींची तरतूद करावी. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Leave a Comment