देशात तुटवडा असताना भाजपाच्या कार्यालयात मात्र रेमडेसिवीरच मोफत वाटप ? नवाब मलिकांचा भाजपवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “देशामध्ये रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा असताना सूरतमधील भाजपाच्या कार्यालयात मात्र हेच औषध मोफत वाटले जात आहे. हे राजकारण नाही तर काय आहे?,” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी ट्वीट करुन भाजपाच्या गुजरातमधील रेमडेसिवीर मोफत वाटपावर प्रश्न उपस्थित करीत हल्लाबोल केला.

भाजपनेत्यांकडून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यावर केंद्रातून लसीचा पुरवठा केला जात नाही या विषयी खोट्या बातम्या पसरवू नये असा आरोप केला जातोय. या पार्शवभूमीवर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवार निशाणा साधत त्यांची पोलखोल केली आहे. देशात सध्या रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा आहे. अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गरज आहे. गुजरातमध्येही रेमडेसिवीरची मोठी मागणी आहे, दरम्यान, गुजरातमधील भाजपच्या एका कार्यालयात हे इंजेक्शन मोफत देण्यात येत आहे. यावरून विरोधकांनी गुजरात सरकारला घेरलं आहे.

दरम्यान, गुजरात भाजप अध्यक्ष सी.आर.पाटील यांनी भाजप कार्यालयातून ५ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोना बाधित लोकांच्या नातेवाईकांना देण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं. परंतु जेव्हा ही लस स्टॉकमध्ये नाही त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात भाजप कार्यालयातून ही कशी उपलब्ध झाली असा सवाल विरोधकांनी केला आहे. सूरतमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर रेमडेसिवीर इजेक्शन घेण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची माहिती समोर आली होती.

दरम्यान, या इंजेक्शनवरून महाराष्ट्रात मोठा गदारोळ उडाला आहे. कारण एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारात वापरण्यात येणारे रेमडेसिवीर या इंजेक्शनचा तुडवडा जाणवत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप ही स्थिती सुधारलेली नाही. रुग्णांचे नातेवाईक हे इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी धावाधाव करत असल्याचं चित्र आहे. अशातच नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप करत नवा वाद निर्माण केला आहे. यावर भाजपकडून काय स्पष्टीकरण देण्यात येतं, हे पाहावं लागेल.

Leave a Comment