औरंगाबाद | कोरोना महामारीमूळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यामुळे शाळा महाविद्यालय बाजारपेठ दुकाने बसेस आणि रेल्वे देखील बंद ठेवण्यात आली होती. आता कोरोनाचा कोरोना ची दुसरी लाट आटोक्यात येत असून सरकारने निर्बंध शिथिल करून दिलेल्या वेळामध्ये बसेस बाजारपेठ दुकाने त्याचबरोबर रेल्वेगाड्या परत धावण्यास सुरुवात झाली आहे. परंतु सर्व रेल्वे विशेष रेल्वे म्हणून धावत आहेत.
आरक्षण तिकिटाशिवाय प्रवाशांना प्रवास करता येत नसून रेल्वेचे जनरल तिकीट बंद करण्यात आले आहे. या आरक्षण तिकिटासाठी सर्वसामान्य नागरिकांना जनरल तिकीटांच्या किंमतीपेक्षा जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे. आणि हे आरक्षण तिकीट म्हणजे विशेष रेल्वेचे तिकीट आहे. यामुळे या विशेष रेल्वेच्या तिकिटाच्या नावाखाली पैशांची लूट केली जात आहे. याबाबत रेल्वे प्रवाशांची लूट करणे कधी थांबणार, असा प्रश्न रेल्वे प्रवासी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.
या 22 विशेष रेल्वे असून औरंगाबादेतून कधी दररोज तर कधी सात, आठवड्यातून तीन दिवस आणि पाच दिवस या बसेस धावतात. या विशेष रेल्वे आरक्षित आहे. यामुळे आरक्षित तिकीट नसेल तर प्रवाशांना प्रवास करता येत नसून दुसरा पर्याय नसल्यामुळे त्यांना दुप्पट पैसे मोजावे लागतात. आरक्षण तिकिटाच्या नावाखाली सुरू असलेली लूट बंद व्हायला हवी. आरक्षण तिकीट नसल्यामुळे अर्जंट कोठे जाता येत नाही त्याचबरोबर अगोदर रेल्वेमध्ये ज्येष्ठ प्रवाशांना देण्यात येणारी सवलतही विशेष रेल्वे मध्ये बंद करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लवकरात लवकर जनरल तिकीट देण्यास सुरुवात करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. सचखंड एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, अजंता एक्स्प्रेस, रेणीगुंठा एक्स्प्रेस आणि मराठवाडा एक्स्प्रेस या विशेष रेल्वे औरंगाबाद जिल्ह्यातून जातात.