गांभीर्य केव्हा येणार ः  किराणा, भाजी खरेदीच्या निमित्ताने बाहेरील कोरोना घरात, तोबा गर्दी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कोरोनाची साखळी तोडण्याचे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. बाजारात गर्दी होणार नाही यासाठी अत्यावश्यक सेवेत येणारी दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. किराणा, दुध डेअरी, भाजीपाला विक्रीची दुकाने सुरु आहेत. शहरात मुख्य भाजी मंडीत गर्दी होणार नाही यासाठी जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार या दुकानदाराना कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक केले आहे. मात्र किराणा, भाजीपाला खरेदीच्या नावावर बाजारपेठेत होणारी गर्दी कायम दिसत असल्याने कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही. यासाठी आता बाजारात होणारी गर्दी कमी करण्यासाठी किराणा, दुध डेअरी भाजीपाला विक्रिवर निर्बंध लावण्यात आले आहेत. नवीन नियमाप्रमाणे ही दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळात सुरु राहणार असल्याने त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

बुधवारी शहरातील विविध किराणा दुकानासमोर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच शहरात ठिकठिकाणी असलेल्या भाजी मंडईत देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीतून सातारकराना कोरोनाची अजिबात भिती राहीली नसल्याचेच दिसुन आले.

जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍याचे दृष्‍टीने याआधीच्या निर्बंधांबाबतच्या आदेशामधील अत्यावश्यक बाबीतील आस्थापना, कार्यालय आता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू राहतील. परंतु दुध व दुग्‍धजन्‍य पदार्थ विक्री (डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी), घरपोच दुधविक्री सकाळी ७ ते ११ व यावेळेत सुरू राहिल, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी दिले आहेत.

यामार्गदर्शक सूचना मंगळवारी (ता. २०) रात्री आठ वाजेपासून अंमलात येतील. निश्चित करण्‍यात आलेल्‍या वेळा ह्या व्यक्ती तसेच संस्थांसाठी लागू राहतील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. हे आदेश जिल्ह्यात १ मे २०२१ च्या सकाळी ७ वाजेपर्यत लागू राहतील.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group