व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

10वी 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक आले मात्र हॉल तिकीट कधी मिळणार? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन|  महाराष्ट्र बोर्डाने दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, येत्या फेब्रुवारी महिन्यात 12वीची तर मार्च महिन्यात 10वीची परीक्षा होणार आहे. त्यामुळे आता सर्व विद्यार्थ्यांना वेळ वाया न घालवता आतापासूनच परीक्षांच्या तयारीला लागावे लागणार आहे.  महाराष्ट्र बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, 10 वीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत होणार आहे. तसेच, 12 वीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होऊन 19 मार्चपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या या परीक्षा 11 ते 2 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये होणार आहे.

महाराष्ट्र बोर्डकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता विद्यार्थी या परीक्षांचे हॉल तिकीट कधी मिळेल असा सवाल उपस्थित करत आहेत. हॉल तिकीटजवळ असल्याशिवाय विद्यार्थ्याला परीक्षेला बसता येत नाही. त्यामुळे हे हॉल तिकीट कधी येईल हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थी उत्सुकता दाखवत आहेत. चला तर मग जाणून घेऊया परीक्षांचे हॉल तिकीट कधी प्रसिद्ध कऱण्यात येईल.

हॉल तिकीट कधी मिळणार?

सध्या महाराष्ट्र बोर्डकडून फक्त परीक्षांच्या वेळापत्रकाविषयी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये हॉल तिकीटविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र 12वी आणि 10वी च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे हॉल तिकीट फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. ते परिक्षेच्या पुर्वी विद्यार्थ्यांना मिळेल. (परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे हॉल तिकीट असणे आवश्यक असेल त्याशिवाय परीक्षेला बसता येणार नाही)

वेळापत्रक कुठे पहावे?

वेळापत्रक पाहण्यासाठी महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जावा.

पुढे 10वी आणि 12वी वेळापत्रक 2024 च्या लिंकवर क्लिक करा.

तुमच्यासमोर एक पेज येईल. तेथून वेळापत्रक download करून घ्या.