Pune graduate constituency result: जेथे चंद्रकांत पाटलांचा दबदबा तिथेच संग्राम देशमुखांना बसला फटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । भाजपचा बालेकिल्ला असलेला पुणे पदवीधर मतदारसंघ (Pune graduate constituency result) महाविकास आघाडीने सर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड (Arun Lad wins) यांनी दणदणीत विजय मिळवून भाजपचा (BJP) हा गड खालसा केला. त्यांनी भाजप उमेदवार संग्राम देशमुख (Sangram Deshmukh) यांचा पराभव केला. अरुण लाड यांनी पहिल्या फेरीतच 48 हजार 824 मतांनी बाजी मारली. अरुण लाड यांना एकूण 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली तर विरोधी उमेदवार संग्राम देशमुख यांना 73 हजार 321 मतं पडली.

चंद्रकांत पाटलांना धक्का
पदवीधर निवडणुकीचा हा निकाल म्हणजे भाजपला जसा धक्का आहे, त्यापेक्षा अधिक धक्का चंद्रकांत पाटलांना आहे. कारण ज्या पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचा किंबहुना चंद्रकांत पाटलांचा दबदबा होता, तिथेच भाजपचा उमेदवार मोठ्या फरकारने पराभूत झाला. महत्त्वाचं म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी 12 वर्षे म्हणजे दोन टर्म पुणे पदवीधर मतदारसंघाचं नेतृत्त्व केलं होतं, तिथेच भाजपचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव होणं, हा भाजपपेक्षा चंद्रकांत पाटलांसाठी सेटबॅक आहे.

संग्राम देशमुख कसे हरले?
ज्या मतदारसंघात चंद्रकांत पाटील सलग दोन वेळा जिंकले, त्या मतदारसंघात संग्राम देशमुख कसे हरले हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जाणे साहजिक आहे. चंद्रकात पाटील यांनी या मतदारसंघात पूर्ण ताकद लावली होती. काहीही करुन ही जागा राखण्याचा चंग भाजपने बांधला होता. त्यासाठी उमेदवार निवडीपासून भाजपने आखीव-रेखीव नियोजन केलं.

महाविकास आघाडीकडून अरुण लाड यांना उमेदवारी निश्चित होती. त्यामुळेच भाजपने त्या तोडीचा उमेदवार निवडला. त्यासाठी सांगली जिल्ह्यातील संग्राम देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. पुणे पदवीधर मतदारसंघ हा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा आहे. मात्र या मतदारसंघाची रणभूमी ही सांगली होती. कारण अरुण लाड आणि संग्राम देशमुख दोन्ही उमेदवार सांगलीचेच आहेत. अरुण लाड यांनी ६ वर्षापूर्वीच आपली ताकद दाखवली होती. त्यामुळे या निवडणुकीत ते कोणत्या तयारीने उतरले असतील याचा आपण अंदाज बांधू शकतो. (Where Chandrakant Patil won in a row, how did Sangram Deshmukh lose?)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’