राज्यात काँग्रेसचे अस्तित्व राहिले कुठे? : राधाकृष्ण विखे- पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर | काॅंग्रेसमधून आता भारतीय जनता पक्षात महसूल मंत्री झालेले व मुलगा खासदार झाल्यानंतर राधाकृष्ण विखे- पाटील यांनी कोल्हापूरात पहिल्यादाच आल्यानंतर विरोधकांवर टीकास्त्र सोडले. राज्यात केवळ मंत्रीपदापुरते काँग्रेसचे अस्तित्व होते. ना नेत्यांना पक्षात स्वारस्य होते, ना पक्ष नेतृत्वाला स्वारस्य होते. तेव्हा आता राज्यात काँग्रेसचे अस्तित्व राहिले कुठे? असा प्रतिप्रश्न करित काॅंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील आज कोल्हापुरात आले होते. विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेसवर निशाणा साधला. पुढे ते म्हणाले, अवैध वाळू उपसा ही राज्याला लागलेली कीड आहे. याबाबत सर्वंकष धोरण आणले जाईल, असे सांगत राज्य गेल्या अडीच वर्षात पिछाडीवर गेले आहे. राज्याला पुनवैभव प्राप्त करून देऊ असेही ते म्हणाले.

इचलकरंजी स्वतंत्र तालुका लवकरच ः- शिर्डी मतदारसंघातुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना हा मतदारसंघ राखीव आहे. याबाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, तो मान्य असेल असेही त्यांनी सांगितले. इचलकरंजी स्वतंत्र तालुका करण्याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, आ. प्रकाश आवाडे यांनी मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की मी करणार.