हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : फिक्स्ड डिपॉझिट्स हा गुंतवणूकीचा सर्वांत लोकप्रिय प्रकार आहे. यामध्ये बँकेच्या बचत खात्यापेक्षा चांगले रिटर्न देखील मिळतात. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने ते बचत खात्यांपेक्षा चांगलेही आहेत. यामध्ये, मॅच्युरिटीचे वेगवेगळे कालावधी असतात. जे आपल्याला आपल्या सोयीनुसार निवडता येतात. Bank FD
जवळपास सर्वच बँकांकडून फिक्स्ड डिपॉझिट्सची सुविधा दिली जाते. तसेच प्रत्येक बँकेकडून फिक्स्ड डिपॉझिट्ससाठी वेगवेगळे व्याजदर दिले जातात. हे लक्षात घ्या कि, RBI कडून रेपो दरात वाढ झाल्यानंतर बँकांनी FD वरील व्याजदरातही वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, रेपो दरात कपात झाल्यास तो कमी देखील होतो. फिक्स्ड रेट एफडी किंवा फ्लोटिंग रेट एफडी असे FD चे प्रकार आहेत. अशा परिस्थितीत, जास्तीत जास्त नफा मिळविण्यासाठी कोणत्या प्रकारच्या FD मध्ये गुंतवणूक करणे जास्त फायदेशीर ठरेल ते पाहुयात… Bank FD
तज्ञांचे मत जाणून घ्या
तज्ञ सांगतात की, सध्या रेपो दरात वाढ होते आहे ज्यामुळे फ्लोटिंग रेट FD आकर्षक दिसत आहे कारण त्यावरील व्याजदर वाढत आहेत. त्याच वेळी, जर हे दर घसरण्यास सुरुवात झाली तर FD वरील व्याजदर देखील खाली येतील. मात्र फिक्स्ड रेटवाल्या एफडीबाबत असे घडत नाही. त्यावर, आधीच ठरलेला व्याजदर दिला जातो. मात्र, जर यावरील व्याजदर मॅच्युरिटी आधीच जास्त होत असेल तर ते नुकसानीचे ठरू शकते. त्यामुळे फिक्स्ड रेटवाल्या FD मध्ये गुंतवणूक करताना आपल्या कालावधीचा सध्याचा व्याजदर फिक्स्ड रेटपेक्षा जास्त पुढे जाईल की नाही हे एकदा तपासून पहा. Bank FD
रेपो दरात बदल
गेल्या 4 महिन्यांत RBI कडून रेपो दरात 3 वेळा वाढ करून तो 5.40 टक्क्यांवर आला आहे. महागाई नियंत्रित करण्यासाठी हे केले जाते. त्यामुळे बँकांना RBI कडून कर्ज घेणे महागले असून ते रिटेल ग्राहकांनाही महागड्या दराने कर्ज देऊ लागले आहेत. त्यामुळे कर्जाची मागणी कमी होते आणि बाजारातील कॅश फ्लो काही प्रमाणात कमी होतो. मात्र रेपो रेट वाढल्याने एफडीवरील व्याजदरही वाढू लागतात. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळतो. Bank FD
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/fixed-deposit-rate.html
हे पण वाचा :
Aadhaar Card मधील मोबाईल नंबर कसा बदलायचा ते जाणून घ्या !!!
Bank : सरकारी बँकांकडून डिसेंबरपर्यंत देशभरात उघडल्या जाणार 300 नवीन शाखा !!!
HDFC Bank ने ग्राहकांसाठी सुरू केली SMS बँकिंगची सुविधा, त्याचा लाभ कसा घ्यावा ते पहा
LIC ची पॉलिसी सरेंडर करण्याआधी त्यासंबंधीच्या ‘या; महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या