हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : परदेशी गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन, जागतिक कल, रुपयाची अस्थिरता आणि कंपन्यांच्या तिमाहीचे निकाल यावरून येत्या आठवड्यात शेअर बाजारांची दिशा ठरली जाणार आहे, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या किंमतीचाही बाजारवर परिणाम होईल. स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे रिसर्च प्रमुख संतोष मीणा म्हणाले की,” येत्या आठवड्यात HDFC बँकेच्या तिमाही निकालांबाबत बाजार प्रतिक्रिया देईल. याबरोबरच येत्या आठवड्यात अंबुजा सिमेंट, हिंदुस्तान युनिलिव्हर, इंडसइंड बँक आणि विप्रो यांच्या तिमाहीचे निकालही येणार आहेत.”
मीना पुढे म्हणाले की,”जागतिक आघाडीवरील बँक ऑफ जपान आणि युरोपियन सेंट्रल बँक यांचा व्याजदरांबाबतचा निर्णय देखील बाजाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच डॉलर निर्देशांकाचा कल देखील बाजाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरेल. यासह मीना असेही म्हणाले की,” बाजार वस्तूंच्या किंमती आणि विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या (FII) वृत्तीवर देखील लक्ष ठेवेल.
महागाईची वाढती चिंता
SAMCO सिक्युरिटीजचे प्रमुख (मार्केट आउटलुक) अपूर्व सेठ म्हणाले की,” वाढत्या महागाईची चिंता आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीच्या भीतीमुळे येणाऱ्या काळात भारतीय बाजारपेठेत अस्थिरता राहील. सध्या कंपन्यांच्या तिमाहीचे निकाल येत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी कंपनीच्या आकडेवारीपेक्षा व्यवस्थापनाचे भविष्यातील अंदाजाकडे लक्ष ठेवावे.” Share Market
महागाईची वाढती चिंता
SAMCO सिक्युरिटीजचे प्रमुख (मार्केट आउटलुक) अपूर्व सेठ म्हणाले की,” वाढत्या महागाईची चिंता आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीच्या भीतीमुळे येणाऱ्या काळात भारतीय बाजारपेठेत अस्थिरता राहील. सध्या कंपन्यांच्या तिमाहीचे निकाल येत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी कंपनीच्या आकडेवारीपेक्षा व्यवस्थापनाचे भविष्यातील अंदाजाकडे लक्ष ठेवावे.” Share Market
कंपन्यांच्या तिमाहीचे निकाल
जूनच्या तिमाहीत एचडीएफसी बँकेचा निव्वळ नफा 20.91 टक्क्यांनी वाढून 9,579.11 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. स्टँडअलोन आधारावर बँकेचा निव्वळ नफा वाढून 9,195.99 कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत तो 7,729.64 कोटी रुपये इतका होता. Share Market
जागतिक संकेत आणि कंपन्यांच्या तिमाहीचे निकाल महत्त्वाचे
रेलिगेअर ब्रोकिंगचे रिसर्च उपाध्यक्ष असलेलं अजित मिश्रा यांनी सांगितले की,”जागतिक संकेत आणि कंपन्यांच्या तिमाहीचे निकाल बाजाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे राहतील. देशातच नव्हे तर जागतिक पातळीवरही बुल आणि बेअर यांच्यात संघर्ष सुरू आहे. गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 721.06 अंकांनी किंवा 1.32 टक्क्यांनी घसरला. Share Market
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.nse.com
हे पण वाचा :
PM Kisan च्या KYC सहित 31 जुलैपर्यंत पूर्ण करा ‘ही’ महत्त्वाची कामे !!!
SBI ग्राहकांसाठी खुशखबर, आता FD वर मिळणार जास्त व्याज !!!
Gold Investment : सोन्यामध्ये अशाप्रकारे गुंतवणूक करून मिळवा भरपूर पैसे !!!
Business Idea : LED बल्ब युनिट बसवून मिळवा लाखोंचा नफा !!!
इशारा !!! आता मोठ्या व्यवहारांवर Income Tax Department ठेवणार लक्ष, पकडताच बजावणार नोटीस