सांगली : रस्त्यात सध्या कोरोना महामारी वेगाने वाढत आहे. राज्य सरकारने कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी वीकेंड लोकडाऊन लागू केले आहे. शासनाने लावलेल्या निर्बंधांमुळे व्यापारी वर्गावर अनेक समस्या ओढवल्या आहेत. यापार्श्वभूमीवर संभाजी भिडे यांनी कोरोना हा रोग नाही..कोरोनाने मरतात ते जगण्यायोग्य नाहीत असे वक्तव्य केले आहे. सांगली येथे लोकडाऊनविरोधात आज व्यापाऱ्यांनी निषेध मोर्चा आयोजित केला होता. यावेळी भिडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कोरोनाच्या नावाखाली देशात-राज्यात खेळखंडोबा सुरु आहे. दोन सरकार जबाबदार – जे जगायचे ते जगतील, जे मरायचे ते मरतील. कोरोना घालवण्यासाठी छत्रपती शिवाजी-संभाजी महाराजांचे आदर्श ठेवून राज्य केले पाहिजे. कोरोना अस्तित्वात नाही. लॉकडाऊनची गरज नाही. सरकारने काही कारू नये. ज्याला-त्याला आपल्या जीवावर सोडून द्यावे. कोरोना हा रोग नाही..कोरोनाने मरतात ते जगण्यायोग्य नाहीत असं भिडे म्हणाले.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/255535069632115
यावेळी भिडे म्हणाले, हातावरची माणसं उद्ध्वस्त होत आहेत. शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. लॉकडाऊनची गरज नाही. व्यसने वाढवायची, गांजा अफू दारु दुकाने वाढवायचं काम सुरु आहे, असं संभाजी भिडे म्हणाले. कोरोनाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहेत. कोरोना कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे. प्रत्येकाला जीवाची काळजी आहे, तो घेईल , सरकारने यात लक्ष घालू नये. सरकारने पारदर्शक कारभार करावा, लॉकडाऊनची गरज नाही.
कोरोनाच्या नावाखाली देशात-राज्यात खेळखंडोबा सुरु आहे. दोन सरकार जबाबदार – जे जगायचे ते जगतील, जे मारायचे ते मारतील. कोरोना घालवण्यासाठी छत्रपती शिवाजी-संभाजी महाराजांचे आदर्श ठेवून राज्य केले पाहिजे. कोरोना अस्तित्वात नाही. लॉकडाऊनची गरज नाही. सरकारने काही कारू नये. ज्याला-त्याला आपल्या जीवावर सोडून द्यावे, असंही ते म्हणाले.