हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 12 नोव्हेंबर रोजी म्हणजेच उद्या संपूर्ण राज्यभरात दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली जाईल. त्याचबरोबर, उद्या श्री गणेश आणि लक्ष्मी मातेची शुभमुहूर्त पाहून पूजा करण्यात येईल. या पूजेसाठी लागणारे साहित्य तुम्हाला माहीत नसेल तर पुढे देण्यात आलेली यादी नक्की तपासा. या यादीच्या मदतीने तुम्ही आजच बाजारात जाऊन सर्व साहित्य आणू शकता. ज्यामुळे तुमची ऐन मुहूर्तावर कोणतीही गडबड होणार नाही.
लक्ष्मी पूजेसाठी लागणारे साहित्य
– उद्याच्या पूजेसाठी सर्वात प्रथम श्री गणेश लक्ष्मी माता आणि कुबेर देवता यांची मूर्ती लागेल.
– यासोबत कुबेर यंत्र, लक्ष्मी यंत्र, माता सरस्वतीची मूर्ती किंवा चित्र असल्यास ते ही पूजेत मांडावे.
– पूजेसाठी कमळाचे फूल, आंब्याची पाने, कमळ गट्टा, झेंडूचे फूल, दुर्वा, अपरजिता आणि हिबिस्कसचे फूल देखील लागेल.
– 5 सुपारी, 5 सुपारी, अत्तर धूप, कापसाची वात, नैवेध, कापूर, तूप, मोहरीचे तेल पणत्या, नारळ, मिठाई, सुका मेवा, खीर, दुर्वा, लाकडी चौका लाल पिवळे कापड, कुंकू, हळद, अक्षता या सर्व गोष्टी पूजेसाठी अति आवश्यक असते.
– लक्ष्मी मातेच्या पूजेवेळी चांदीचे किंवा सोन्याचे नाणे पूजेत ठेवावे.
लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त
पंचांगानुसार यंदाची दिवाळी 12 नोव्हेंबर रोजी आली आहे. यानुसार, गणेश पूजन आणि लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:40 पासून सुरू होऊन 7:36 पर्यंत असेल. परंतु, महानिशीथकालचा शुभमुहूर्त रात्री 11:49 ते 12:31 पर्यंत असेल. यामधील सर्वात शुभ मुहूर्त महानिशीथकालचा असेल.