हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आणि इंडियाचे वॉरेन बफे’ म्हणून ओळखले जाणारे Rakesh Jhunjhunwala यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने आर्थिक जगतात एकच शोककळा पसरली आहे. झुनझुनवाला यांनी गेल्या महिन्यात 5 जुलै रोजी 62 वा वाढदिवस साजरा केला. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या झुनझुनवाला यांचा बिग बुल बनण्यापर्यंतचा प्रवास एकदम रोमांचक आहे.
हे लक्षात घ्या कि, राकेश झुनझुनवाला यांना अनेक तरुण गुंतवणूकदार हे आदर्श मानत होते. अनेक लोकं त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समावेश असलेले शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्येही ठेवायचे. याद्वारे देखील झुनझुनवाला यांना नफा मिळत असे. झुनझुनवाला यांच्याकडे एकूण 32 कंपन्यांच्या शेअर्सच्या रूपात 32,000 कोटी रुपयांचा पोर्टफोलिओ होता. जरी त्यांनी बऱ्याच ठिकाणी गुंतवणूक केलेली असली तरीही त्यांच्याकडे असे काही शेअर्स होते ज्यांनी इतर सर्व शेअर्सपेक्षा जास्त रिटर्न दिला होता.
आज आपण त्यांनी गुंतवणूक केलेल्या अशाच काही शेअर्सबाबत जाणून घेणार आहोत ज्याद्वारे त्यांनी भरपूर नफा कमावला. तसेच आपण अशा शेअर्सची देखील माहिती घेऊयात ज्यामध्ये त्यांना यश मिळू शकले नाही. झुनझुनवाला नेहमी म्हणायचे की, बाजारातील तोटा हा गुंतवणुकदाराच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि ज्या गुंतवणूकदाराला तोट्याची भीती आहे तो शेअर बाजारातून नफा कमवू शकणार नाही. चला तर मग झुनझुनवाला यांना नफा आणि तोटा मिळवून देणाऱ्या शेअर्सबाबत जाणून घेउयात …
टायटन
या एकमेव शेअर्सच्या आधारे राकेश झुनझुनवाला यांचा जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांच्या लिस्टमध्ये समावेश झाला. त्यांनी 2000 साली टायटन मधील 6 कोटी शेअर्स विकत घेतले. त्यावेळी 3 रुपये प्रति शेअर्स किंमत असलेला हा शेअर आता सुमारे 2500 रुपयांच्या पातळीवर आहे. झुनझुनवाला यांना खात्री होती की, उपभोगाशी संबंधित क्षेत्रामध्ये वाढ होईल आणि अगदी तसेच झाले. यानंतर टायटनच्या ज्वेलरी व्यवसायात प्रचंड वाढ झाली. ज्याचा त्यांना मजबूत फायदा झाला.
टाटा टी
झुनझुनवाला यांनी 1986 मध्ये या शेअर्समध्ये पैसे गुंतवले होते. यावेळी 143 रुपये भाव असताना त्यांनी गुंतवणूक केली होती आणि नंतर जेव्हा भाव 2200 रुपयांवर आले तेव्हा त्यांनी ते आपल्या पोर्टफोलिओमधून काढून टाकले.
क्रिसिल
2003-2005 या काळात त्यांनी क्रिसिलमध्ये 8 टक्के हिस्सेदारी घेतली होती. भारतात क्रेडिट तपास संस्था वाढतील असा त्यांचा अंदाज होता. जो अगदी योग्य ठरला. आज या कंपनीतील त्यांची गुंतवणूक 1300 कोटींच्या पुढे गेली आहे.
मेट्रो ब्रँड्स
Rakesh Jhunjhunwala यांनी 2007 मध्ये मेट्रो ब्रँडमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. सध्या, त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये याचा वाटा 3,348 कोटी रुपयांचा आहे.
‘या’ शेअर्समध्ये यश मिळाले नाही
2013 मध्ये Rakesh Jhunjhunwala यांनी DHFL चे 25 लाख शेअर्स खरेदी केले होते मात्र 2018 पर्यंत ही कंपनी आर्थिक अडचणीत आल्यामुळे बुडाली. मानधना रिटेल या शेअर्समुळे देखील झुनझुनवाला यांना खूप नुकसान सहन करावे लागले. हा शेअर त्यांनी 247 रुपये किंमतीला विकत घेतला मात्र 16 रुपयांना त्यांना तो विकावा लागला. डीबी रियल्टीमध्ये देखील त्यांनी 2 कोटींचे वॉरंट खरेदी केले होते. सध्या त्यांना यामध्ये 32 टक्के तोटा सहन करावा लागत आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://en.wikipedia.org/wiki/Rakesh_Jhunjhunwala
हे पण वाचा :
5 हजार रुपये ते 46 हजार कोटींचे मालक असा आहे Rakesh Jhunjhunwala यांचा शेअर बाजारातील प्रवास !!!
Gold Price : सोने-चांदी महागले, जाणून घ्या आठवडाभरातील सराफा बाजाराची स्थिती !!!
Rakesh Jhunjhunwala यांच्या निधनाने आर्थिक जगतात शोककळा !!! अनेक दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली
Axis Bank कडून FD व्याजदरात बदल; पहा आता किती रिटर्न मिळणार
Central Bank Of India ने FD वरील व्याजदरात केली वाढ, आता किती फायदा होणार ते पहा !!!