हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला खोकला झाला तर आपण डॉक्टरांकडे न जाता मेडिकल वरून सिरप आणून ते त्यांना देतो. पण ते अतिशय चुकीचं आहे. याचे कारण म्हणजे जगभरात आतापर्यंत चुकीच्या कप सिरपमुळे तब्बल 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने भारतात तयार झालेल्या ७ सिरपला खराब गुणवत्तेमुळे ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं आहे.
डब्ल्यूएचओ ने याबद्दल बोलताना म्हटलं की, भारत आणि इंडोनेशियामधील फार्मा कंपन्यांनी तयार केलेल्या 20 हून अधिक कफ सिरपची चाचणी घेण्यात आली . हे कफ सिरप गाम्बिया आणि उझबेकिस्तानमधील मृत्यूनंतर वादात सापडले होते. त्यामुळे भारताने तयार केलेल्या या कप सिरप वर वैद्यकीय उत्पादन अलर्ट देखील जारी करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारच्या खराब गुणवत्तेच्या कफ सिरप प्यायल्यामुळे 300 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
भारताच्या ड्रग्स कंट्रोलरने नोएडा येथील मेरियन बायोटेक, हरियाणा येथील मेडेन फार्मास्यूटिकल्स, चेन्नई येथील ग्लोबल फार्मा आणि पंजाब येथील क्यू पी फार्माकेम या देशातील उत्पादनांची चौकशी केली. या तपासणीत काही अनियमितता आढळून आल्याने औषध नियंत्रकाने या कंपन्यांच्या कामकाजावर बंदी घातली. त्यामुळे आता खोकल्यावर औषध म्हणून कफ सिरप घ्यावं की नाही हा प्रश्न उभा राहिला आहे.