WHO च्या प्रमुखांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार ; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी करोनाविरोधातील भारत देत असलेल्या लढ्याबद्दल कौतुक केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Covax लस आणण्यासाठी दाखववेली कटिबद्धता आणि जगभरात ती उपलब्ध करुन देण्यासाठी दाखवलेल्या कटिबद्धतेबद्दल ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी स्तुती केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांशी फोनवर चर्चा केली आणि कोरोनाचा सामना करण्यासाठी जागतिक भागीदारीत समन्वय साधण्याच्या संघटनेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे कौतुक केले. या चर्चेदरम्यान नरेंद्र मोदींनी कोरोनावर मात करताना अन्य रोगांविरूद्धच्या लढाईत सुद्धा लक्ष विचलित होऊ नये, यावरही भर दिला.

विकसनशील देशांमध्ये आरोग्य यंत्रणेला संघटनेने दिलेल्या पाठिंब्याचे महत्त्वही त्यांनी व्यक्त केले. पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी संघटना आणि भारतीय आरोग्य प्राधिकरण यांच्यातील जवळच्या आणि नियमित भागीदारीवर जोर दिला आणि आयुष्मान भारत आणि क्षयरोग (टीबी) विरूद्ध मोहिमेसारख्या देशांतर्गत उपक्रमांचे कौतुक केले. ते म्हणाले की, जागतिक आरोग्याच्या संदर्भात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment