हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 लोकसभा निवडणुकीला अजून 2 वर्ष असली तरी सत्ताधारी भाजप प्रणित NDA आणि विरोधकांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे . मोदींसारख्या तुल्यबळ व्यक्तीला हरवण्यासाठी विरोधकांकडून महागठबंधनची तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर 2024 निवडणुकीत विरोधकांकडून पंतप्रधान पदाचा कोण असेल असा सवाल समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव याना विचारलं असता त्यांनी 3 नेत्यांची नाव सांगितली.
अखिलेश यादव म्हणाले, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच 3 जण 2024 मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात. यावेळी त्यांनी स्वतःला या शर्यतीतून बाहेर गेले. मला सध्या फक्त उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रित करायचे आहे असेही त्यांनी सांगितले.
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि आरजेडी सोबत सत्तास्थापन करणे हे एक सकारात्मक लक्षण’ असल्याचे अखिलेश यादव यांनी म्हंटल . पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात मजबूत पर्याय तयार होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, विरोधकांकडून नितीशकुमार यांचेही नाव पंतप्रधान पदासाठी समोर येऊ शकत. परंतु या सर्व प्रक्रियेत काँग्रेसची भूमिका निर्णायक राहणार हे मात्र नक्की