लक्षणे नसणारे रुग्ण कोरोनाचे संक्रमण करत नाहीत – WHO

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ च्या डिसेंबरपासून जग कोरोना विषाणूशी लढतो आहे. या विषाणूने आधी चीन, इटली आणि आता जगाला हादरवून सोडले आहे. गेल्या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण जगभरात पसरले आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ या विषाणूची लस शोधण्यात व्यस्त आहेत. यासोबतच या विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी जगभरातील देशांमध्ये संचारबंदी करण्यात आली आहे. या विषाणूचे संक्रमण झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधणे त्यांना विलगीकरणात ठेवणे असे सर्व उपाय यंत्रणा जगभरात राबवित आहेत. असे काही रुग्णही सापडले आहेत. ज्यांना कोरोनाची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. मात्र त्यांना कोरोनाचे निदान झाले आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही विलगीकरणात ठेवले जात आहे. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने अभ्यासाअंती लक्षणे नसणारे रुग्ण हा आजार परसवत नाहीत असा मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या या खुलाशानंतर आता जे रुग्ण कोणतीच लक्षणे दाखवीत नाहीत. अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना होण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी झाल्याने साऱ्यांनाच दिलासा मिळाला आहे. न्यूज मॅक्स या चॅनेलवरील मुलाखतीत फ्रान्सिस हॉस्पिटल च्या मेन्स हेल्थ सेक्शन चे संचालक डॉ डेविड समदी यांनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. डॉ डेव्हिड यांनी हा ३६० डिग्रीतील यु टर्न असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे आता ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत मात्र त्यांना कोरोनाचे निदान झाले आहे अशा लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांना घाबरण्याचे काही कारण नाही.

जागतिक आरोग्य संघटना विविध देशांच्या संपर्कात राहून लक्षणे नसणाऱ्या रुग्णांकडून होणाऱ्या संक्रमणाचा अभ्यास करत आहे. नुकतेच त्यांनी या रुग्णांकडून खूप कमी प्रमाणात संसर्ग होत असल्याचे जाहीर केले होते. तसेच लक्षणे नसणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही कमी असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता या नव्या खुलाशाने साऱ्यांनाच दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment