नवी दिल्ली | देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्व देशांनी काळजी घेण्याची गरज आहे. आता त्यांनी जर पूर्वकळजी घेतली नाही तर परिस्थिती अजून गंभीर होण्याची शक्यता असून पुन्हा एकदा संपूर्ण देशभरात लॉकडाउन करावा लागेल. असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी दिला आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेला लॉक डाऊन अनेक देश शिथील करताना दिसत आहेत. त्यावर टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी आपली प्रतिक्रिया दिली. जरी करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तरी पूर्वीप्रमाणे सगळं काही सुरळीत होण्याची शक्यता कमी आहे. असही त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की निर्बंध शिथील झाल्यानंतरही लोकांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. आरोग्य यंत्रणाही यासाठी तयार असली पाहिजे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल, आपण घाबरुन जगू शकत नाही, पण त्याचवेळी तयार राहणं गरजेचं आहे. आपण एकीकडे या महामारीशी लढा देत असताना दुसरीकडे अशा साथींचा सामना कऱण्याची तयारीही केली पाहिजे. असही त्यांनी सांगितलं.