हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Who Will Be Modi’s Successor। आज संपूर्ण देशात मोदींची हवा बघायला मिळतेय. काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत जिकडे तिकडे मोदी मोदी आणि फक्त मोदी .. मोदी म्हणजेच भाजप असं एकूण चित्र आहे. स्थानिक निवडणुकीपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत मोदींच्या नावावरच मते मागितली जातायत. नरेंद्र मोदी या नावावरच सध्याची भाजप यशाची चव चाखत आहे असं म्हंटल तरी ते चुकीचे ठरणार नाही. परंतु सध्या मोदींचे वय ७५ वर्ष आहे. अशावेळी त्यांच्यानंतर भाजपची धुरा कोणाच्या खांद्यावर असणार? मोदींचा उत्तराधिकारी कोण असणार? याबाबत मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. आता खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) याना विचारलं असता त्यांनी अतिशय हुशारीने उत्तर दिले.
काय म्हणाले मोहन भागवत? Who Will Be Modi’s Successor
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शताब्दीनिमित्त चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आरएसएस प्रमुख मोहन भागवत याना मोदींच्या उत्तराधिकारी बाबत प्रश्न केला असता ते म्हणाले, कि याबाबत भाजप आणि मोदी आपापसात चर्चा करून निर्णय घेतील. भागवत यांनी हुशारी दाखवत कोणत्याही एका नेत्याचे नवा टाळलं. परंतु नेहमीच अशी चर्चा सुरु असते कि नरेंद्र मोदी यांच्यानंतर योगु आदित्यनाथ, नितीन गडकरी किंवा देवेंद्र फडणवीस त्यांची जागा घेऊ शकतात. Who Will Be Modi’s Successor
दरम्यान, याप्रसंगी मोहन भागवत यांनी तामिळनाडूमध्ये आरएसएसच्या मर्यादेवरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की तामिळनाडूमध्ये १००% राष्ट्रवादी भावना आहे, परंतु काही कृत्रिम अडथळे या भावनेच्या पूर्ण अभिव्यक्तीमध्ये अडथळा आणत आहेत. हे कृत्रिम अडथळे फार काळ टिकणार नाहीत आणि आपण ते दूर करण्यासाठी काम केले पाहिजे. तामिळनाडूचे लोक संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रीय हितासाठी समर्पित आहेत आणि ही मूल्ये आणखी मजबूत करण्याची आवश्यकता आहे असेही मोहन भागवत यांनी म्हंटल. मोहन भागवत यांनी दक्षिण भारतीय राज्यांच्या संस्कृतीचे, विशेषतः त्यांच्या पारंपारिक पोशाखाचे, “वेष्टी” चे कौतुक केले, जे लोकांच्या सांस्कृतिक संबंधांचे प्रतिबिंब आहे.




