हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याला एक कर्तृत्ववान मुख्यमंत्री खुर्चीवर बसवायचा आहे मग तो पुरुष असो किंवा स्त्री असे मोठं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यांनतर राज्यातील राजकारणात चर्चाना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरेंच्या मनातील ती महिला मुख्यमंत्री कोण यावरही तर्क- वितर्क लावले जात आहेत. आज आपण जाणून घेऊया अशा कोणकोणत्या महिला नेत्या आहेत ज्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर येऊ शकत…
खरं तर जेव्हा जेव्हा महिला मुख्यमंत्री पदाची चर्चा होते तेव्हा तेव्हा सर्वांसमोर पहिले नाव येते ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि अभ्यासू नेत्या सुप्रिया सुळे… सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या आहेत. सुप्रिया सुळे या सलग ३ वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. मात्र असं असलं स्त्री महाराष्ट्राच्या राजकारणाशी त्यांची नाळ अजूनही कायम आहे. राज्यातील अनेक विषयांवर त्या परखडपणे मत मांडत असतात. त्यामुळे महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेंचं नाव समोर येऊ शकत.
दुसरं नाव म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे …. खरं तर रश्मी ठाकरे या सक्रिय राजकारणात सहभागी नाहीत, मात्र पक्ष आणि पक्षांतर्गत निर्णयांमध्ये त्यांचा असलेला प्रभाव कायम चर्चेत असतो. याशिवाय, ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले त्याचप्रमाणे रश्मी ठाकरे यांचे नावही समोर येऊ शकत. भाजप नेत्यांनी तर आत्तापासूनच रश्मी ठाकरेंच्या नावावरून उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात समान नागरी कायदा लागू होणार? फडणवीसांचे सूचक विधान
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/QtVcXDAEdT#Hellomaharashtra @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 1, 2022
रश्मी ठाकरे यांचं नाव वगळलं तर शिवसेनेत सुषमा अंधारे, मनीषा कायंदे, नीलम गोऱ्हे, किशोरी पेडणेकर या आक्रमक महिला नेत्या आहेत. परंतु या नेत्यांच्या राजकीय ताकदीला काही मर्यादा आहेत. परंतु जर सत्ता आली आणि ठाकरेंनी मनात आणलं तर ते यामधील कोणत्याही महिला नेत्याला मुख्यमंत्रीपदी बसवू शकतात.
जर भाजपचा विचार केला तर भाजपकडे पंकजा मुंडे या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असलेलं नाव आहे. मात्र आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहोत,’ अशी भावना व्यक्त केल्यानंतर पंकजा मुंडे या राज्यातील राजकारणात बाजूलाच पडल्या आहेत. शिंदे गटाचा विचार केला तर त्यांच्याकडे भावना गवळी, यामिनी जाधव, लता सोनावणे यांसारख्या महिला नेत्या आहेतच परंतु त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी वाटते.