जनरल रावत यांच्या निधनानंतर कोण होणार नवे CDS ?? ‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याचे नाव आघाडीवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पहिले सीडीएस यांच्या अपघाती मृत्यूमुळं संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे. संपूर्ण भारतीय लष्कराची कमान ते सांभाळत होते. पण त्यांच्या निधनानं आता सीडीएसचं पद रिकामं झालंय. एकीकडे चीन आणि पाकिस्तान देशावर कुरघोडी करत असताना अशा वेळी जास्त दिवस हे पद रिकामे ठेवण बर नाही. त्यामुळे देशाचे पुढचे सीडीएस कोण?  असा प्रश्न निर्माण झाला असून यामध्ये मराठमोळ्या  जनरल एमएम नरवणे यांचे नाव आघाडीवर आहे.

तिन्ही सेना प्रमुखांमधून सर्वात अनुभवी आणि ज्येष्ठ व्यक्तीची या पदासाठी निवड केली जाऊ शकते. सध्यस्थितीत जनरल एमएम नरवणे हेच देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी आहेत. त्यातही जनरल रावत यांनी गेल्या काही काळात सीडीएस म्हणून जे काही प्रोजेक्ट सुरु केलेत, काम हाती घेतलेत, त्याची माहिती आणि अनुभव हा सर्वाधिक जनरल नरवणेंनाच आहे. कारण नरवणे हे सध्याचे लष्करप्रमुख आहे. नरवणे हे युद्धनितीतील सर्वात मोठे जाणकारही आहेत.

काश्मीर ते ईशान्येकडील राज्यांमध्ये तैनात असताना दहशतवादी कारवाया रोखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नरवणे श्रीलंकेत 1987 दरम्यान पार पडलेल्या ऑपरेशन पवनमध्ये पीस कीपिंग फोर्सचा महत्त्वाचा भाग होते. जनरल एमएम नरवणे यांनी 1 सप्टेंबर रोजी भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता.