सूर्याच्या कमबॅकनंतर कोणाचा पत्ता कट होणार? कशी असेल मुंबईची Playing XI

suryakumar yadav mi
suryakumar yadav mi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ मध्ये सलग पहिले तिन्ही सामने गमवल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) गोटात चिंतेचं वातावरण आहे. संघाला अजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. उद्या 7 एप्रिल रोजी मुंबईचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध (MI Vs DC) होणार असून सूर्यकुमार यादव मुंबईच्या ताफ्यात परतल्याने मुंबईसाठी ही मोठी दिलासादायक गोष्ट आहे. सूर्यकुमार यादवच्या एंट्रीने मुंबईच्या संघाला दहा हत्तीचे बळ मिळणार असलं तरी कोणत्या खेळाडूला बाहेर बसावं लागेल हा प्रश्न निर्माण झालाय. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा खास करून नंबर ३ किंवा ४ वर फलंदाजी करतो, त्यामुळे युवा फलंदाज नमन धीरला बाहेर बसावं लागण्याच्यी शक्यता आहे.

२४ वर्षीय नमन धीर सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थित मुंबईकडून पहिले तिन्ही सामने खेळला मात्र त्याला म्हणावी अशी छाप पाडता आली नाही. ३ सामन्यात त्याने अवघ्या ५० धावा केल्या. त्याने २०० च्या स्ट्राईक रेटने या धावा काढल्या हे मान्य तरीही मोठी खेळी खेळण्यात मात्र त्याला अपयश आलं आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव संघात परतल्यास नमन धीरलाच बाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे.

याशिवाय युवा वेगवान गोलंदाज क्वेना माफाका आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनाही मुंबई इंडियन्स अंतिम ११ मधून बाहेर करू शकते. त्यांच्याऐवजी मोहम्मद नबी आणि नुवान तुषारा याना संधी मिळू शकते. मोहम्मद नबी हा अफगाणिस्तानचा दिग्गज खेळाडू म्हणून ओळखला जातो. नबीची ऑफ स्पिन गोलंदाजी आणि तळाला आक्रमक फलंदाजी मुंबई इंडियन्ससाठी फायद्याची ठरेल. तर नुवान तुषाराचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील अनुभव मुंबईच्या कामी येऊ शकतो. मुंबई इंडियन्स संघ पॉइंट टेबलमध्ये सर्वात खालच्या म्हणजेच 10 व्या स्थानावर आहे. आत्तापर्यंत मुंबईने सर्वच्या सर्व तिन्ही सामने गमावले आहेत. आता उद्या दिल्ली विरुद्ध मुंबई पहिला विजय मिळते का ते पाहायला हवं.