फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाई 13.11 टक्क्यांवर पोहोचली; कच्चे तेल आणि खाद्येतर वस्तू महागल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली I कच्च्या तेलाच्या आणि खाद्येतर वस्तूंच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे घाऊक किंमत निर्देशांक (WPI) महागाई फेब्रुवारी 2022 मध्ये 13.11 टक्क्यांवर पोहोचली. सोमवारी सरकारी आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे. घाऊक महागाई एप्रिल 2021 पासून सलग 11 व्या महिन्यात 10 टक्क्यांच्या वर राहिली आहे. जानेवारी 2022 मध्ये WPI 12.96 टक्के होता तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये तो 4.83 टक्के होता. आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2022 मध्ये खाद्यपदार्थांची महागाई जानेवारीत 10.33 टक्क्यांवरून 8.19 टक्क्यांवर आली.

कच्च्या तेलाच्या किंमतींवर परिणाम दिसू लागला
त्याचप्रमाणे, भाजीपाल्याची महागाई आढाव्याच्या महिन्यात 26.93 टक्के होती, जी जानेवारीत 38.45 टक्क्यांवर पोहोचली होती. “फेब्रुवारी 2022 मध्ये महागाई वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे खनिज तेल, मूळ धातू, रसायने आणि रासायनिक उत्पादने, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि खाद्येतर वस्तूंच्या किंमतीत झालेली वाढ,” असे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.

जानेवारीत 9.42 टक्क्यांच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये उत्पादित वस्तूंची महागाई 9.84 टक्के होती. फेब्रुवारीमध्ये इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाई 31.50 टक्क्यांवर होती. जागतिक कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे कच्च्या पेट्रोलियमची महागाई जानेवारीत 39.41 टक्क्यांवरून 55.17 टक्क्यांवर पोहोचली आहे.