लढा कोरोनाशी । २०१७ मध्ये, ट्रम्प प्रशासनाने व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश केल्यावर ओबामा प्रशासनाने बरेच सल्ले आणि इशारे देऊन सत्तेची लगाम त्यांच्या हाती सोपविली. त्यातील एक चेतावणी साथीच्या आजारांच्या धोक्याची होती. खरं तर, साथीच्या आजारांना प्रत्युत्तर देण्यासाठी एक संपूर्ण साथ प्रतिसाद दल ओबामा प्रशासनाचा भाग होता. परंतु, २०१८ मध्ये सरकारी खर्च कमी करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा साथ प्रतिसाद दल बरखास्त केला.
डिसेंबर २०१९ मध्ये, चीनमध्ये वेगाने पसरत असलेल्या संसर्गजन्य प्राणघातक कोरोना व्हायरसच्या नवीन जमातीबद्दल जगातील अनेक नेते आणि सरकारांना सतर्क केले गेले होते. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सर्व देशांना असा इशारा दिला की त्यांनी १) विलगीकरण करा २) चाचणी घ्या ३) उपचार करा आणि ४) व्हायरसचा वेध घ्या – म्हणजे लागण झालेल्या लोकं कोणत्या प्रवास मार्गाने आली, कोणाला भेटली, इत्यादी शोध घ्या. असे केले नाही तर ते त्यांच्या जनतेला धोक्यात घालतील.
एक महिन्यानंतर, २० जानेवारी २०२० रोजी, अमेरिका आणि दक्षिण कोरीया या दोन्ही देशांच्या सरकारांना त्यांच्या देशापर्यंत पोहोचलेल्या कोरोना व्हायरसच्या पहिल्या प्रकरणाची माहिती मिळाली. एकाच दिवशी या दोन्ही सरकारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. दोघांनाही पहिल्या प्रकरणांची माहिती मिळाल्यानंतर घडलेल्या घटनांची यादी खालीलप्रमाणे आहे.
२० जानेवारी, २०२० ला सापडले : अमेरिकेत पहिले कोरोना व्हायरस प्रकरण – दक्षिण कोरियातले पहिले कोरोना व्हायरस प्रकरण.
जानेवारीचा शेवट : दक्षिण कोरियाने निदान चाचणीस मान्यता दिली आणि जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या प्रक्रियेप्रमाणे पुढील गोष्टी सुरू केल्या: १) विलगीकरण २) चाचणी ३) उपचार आणि ४) व्हायरसचा वेध घेणे.
जानेवारीचा शेवट : अमेरिकेचे अध्यक्षांना बडतर्फ करण्याचा खटला चालू होता, त्यात ते अडकले होते. जनतेला सरकारकडून कोणतेही मार्गदर्शन नाही किंवा संवाद नाही. कोरोना व्हायरस चाचणी अमेरिकेमध्ये विस्तृत प्रमाणात उपलब्ध नाही. WHO च्या शिफारशींकडे दुर्लक्ष केले.
फेब्रुवारीपासून सुरुवात : दक्षिण कोरियाने आक्रमकपणे कोरोना व्हायरस चाचणी सुरू केली.
फेब्रुवारीची सुरूवात : अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकन लोकांना सांगितले की त्यांचे प्रशासन “आमच्या नागरिकांना या धोक्यापासून वाचवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलेल.” ट्रम्प यांनी आपण चीनमधून येणाऱ्या कोरोनाव्हायरसला “बंद” केल्याची घोषणा केली. अमेरिकेमध्ये विस्तृत प्रमाणात चाचणी उपलब्ध नाहीत. WHO च्या शिफारशींचे पालन झाले नाही.
मध्य फेब्रुवारी : दक्षिण कोरियामध्ये कोरोना व्हायरसची २८ प्रकरणे आढळली. चाचणी अंमलबजावणीत दक्षिण कोरियाने चांगले काम केले. लोकसंख्येची त्वरित तपासणी करण्यासाठी_ड्राइव्ह-थ्रू स्क्रीनिंग_सेंटर उपलब्ध केले, ज्याने कोरोना व्हायरस संक्रमण ओळखण्यास मदत झाली.
मध्य फेब्रुवारी : अमेरिकेत कोरोनाव्हायरसची १५ प्रकरणे आढळली. अध्यक्ष ट्रम्प कोरोना व्हायरस बद्दल म्हणतात “बर्याच लोकांना असे वाटते की एप्रिलमध्ये उष्णतेमुळे कोरोना व्हायरस निघून जाईल”. अमेरिकेमध्ये विस्तृत प्रमाणात चाचणी अजूनही उपलब्ध नाही. ट्रम्प प्रशासनाकडून WHO च्या शिफारशींचे पालन केले जात नाही.
फेब्रुवारीचा शेवट : दक्षिण कोरियाने दररोज हजारो चाचण्या घेतल्या. WHO च्या शिफारशी पूर्णपणे लागू केल्या.
फेब्रुवारीचा शेवट : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बर्याच वेगवेगळ्या माहितींमध्ये घोषणा केली, की “आम्ही केलेल्या सर्व गोष्टींमुळे अमेरिकन लोकांना धोका कमी राहील.” “आपल्याकडे हे खूप चांगले नियंत्रणात आहे.” “मला हे सामान्य तापासारखेच दिसते.” “हे अदृश्य होणार आहे. हे चमत्कारासारखे आहे . एक दिवस, हे अदृश्य होईल ”.
एका सभेत ट्रम्प आपल्या समर्थकांना सांगतात, “डेमोक्रॅट्स (विरोधी पक्ष) कोरोना व्हायरसचे राजकारण करीत आहेत. ही त्यांची नवीन लबाडी आहे”
मार्चची सुरुवात : दक्षिण कोरियामध्ये कोरोना व्हायरसची ३००० प्रकरणे आढळली आहेत. दक्षिण कोरिया दररोज १०,००० पेक्षा जास्त लोकांची चाचणी करीत आहे आणि २,९०,००० लोकांपेक्षाही जास्त लोकांची चाचणी घेतली आहे.
मार्चची सुरुवात : अमेरिकेत कोरोना व्हायरसची १०० पेक्षा कमी प्रकरणे आढळली आहेत. अमेरिकेने व्यापकपणे कोरोना व्हायरस चाचणी लागू केली नाही. फेडरल (केंद्र) सरकारने देशभरात विलगीकरण लागू करण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही. इतर देशांनी त्यांच्या ठिकाणी बंद पुकारले होते. WHO च्या शिफारशींकडे दुर्लक्ष केले.
मध्य मार्च : दक्षिण कोरियामध्ये कोरोना व्हायरसची ८००० प्रकरणे आढळली आहेत. नवीन प्रकरणांची संख्या कमी होणे सुरू झाले होते. सक्रिय प्रकरणे कमी होत आहेत.
मध्य मार्च : अमेरिकेत कोरोनाव्हायरसची ८००० पेक्षा कमी प्रकरणे आढळली आहेत. अमेरिकेने देशाच्या मर्यादित भागांत चाचणी सुरू केली. मास्क, व्हेंटिलेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणे देशभरात फारच कमी पडत आहेत. WHO च्या शिफारशींचे अंशतः पालन केले जात नाही कारण आम्ही आवश्यक उपकरणे तयार करण्यास किंवा ताब्यात घेण्यासंबंधीची पावले उचलली नाहीत.
मार्चचा शेवट : दक्षिण कोरियामध्ये कोरोना व्हायरसच्या ९२०० प्रकरणांची ओळख पटली. दक्षिण कोरियाचा कोरोना व्हायरसचा प्रसार खूप कमी झाला आहे. हे अंदाजे ९२०० वर आहे आणि वेग कमी होण्याकडे झुकत आहे.
मार्चचा शेवट : अमेरिकेत कोरोनाव्हायरसची ८६००० पेक्षा कमी प्रकरणे आढळली. युनायटेड स्टेट्स आता चाचण्या देत आहे. कोरोना पॉझिटिव्ह चाचण्यांची संख्या वेगाने वाढत आहे, ते थांबण्याची काही चिन्हे नाहीत. कित्येक राज्यांनी सक्तीने विलगीकरण करण्याचे आदेश दिले पण सर्वच राज्ये नाहीत. फेडरल सरकार बंद जाहीर करणार नाही परंतु लोकांनी पाळावयाच्या “मार्गदर्शक सुचना” सुचवेल. WHO घोषित करते की अमेरिका कोरोनाव्हायरसचे केंद्रबिंदू असेल. या पोस्टच्या लिखाणापर्यंत, अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेने सुचविलेल्यास सूचना पूर्णपणे राबविल्या नाहीत.
हा लेख मूळतः २७ मार्च २०२० रोजी पोस्ट करण्यात आला. त्यादिवशी चीन, इटली आणि दक्षिण कोरिया मिळून जितके कोरोना रुग्ण होते, अमेरिकेत त्यापेक्षा जास्त कोरोना प्रकरणे नोंदली गेली.
४ एप्रिल २०२० : दक्षिण कोरियामध्ये कोरोना व्हायरसची १०१५६ प्रकरणे आढळली आहेत.
४ एप्रिल २०२० : अमेरिकेत कोरोना व्हायरसचे ३००१०६ रुग्ण आढळले आहेत.
२०१८ च्या वसंतऋतूत जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण अमेरिकन ’साथ प्रतिसाद दल’ बरखास्त केला, तेव्हा त्यांचा युक्तिवाद असा होता की ते “काहीही करीत नव्हते”. एकापेक्षा जास्त पत्रकार परिषदांमध्ये, या “फ़्लू” मुळे ठार झालेल्या लोकांच्या संख्येबद्दल आश्चर्य व्यक्त केलं – कोरोना व्हायरसची तपासणी न करता सोडल्यास त्याच्या संभाव्य नुकसानीबद्दल ते किती अज्ञानी आहेत हे त्यांनी दाखवून दिले.
या प्रशासनाच्या कृतींमुळे आणि निष्क्रियतेमुळे किती जीव गमावतील याचा अंदाज लावणं अशक्य आहे. साथ प्रतिसाद दलाने आम्हाला अधिक चांगले तयार केले असते का ? कदाचित आमच्याकडे कोरोना व्हायरस चाचणी दक्षिण कोरियाइतकी लवकर किंवा त्यापहून लवकर झाली असती. कदाचित अग्रणी आरोग्य सेवा पुरवणारांकडे स्वतःस लागण होण्यापासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक असणारी उपकरणे आली असती, ज्यात चेहरा मास्क आणि गाऊन देखील असलं असतं किंवा कदाचित आम्ही यापूर्वीच कारवाई केली असती आणि देशभरातील रुग्णालयांना अतिरिक्त व्हेंटिलेटर प्रदान केले असते.
या विषयावर मी वाचलेल्या सर्वोत्कृष्ट लेखांपैकी एक, लोयोला विद्यापीठ वैद्यकीय स्कूलमधील सार्वजनिक आरोग्य विज्ञानाचे अध्यक्ष डॉ. रिचर्ड कूपर (हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगशास्त्रज्ञ) यांनी कोविड -१९ ची तुलना एका प्रकारच्या परिक्षेशी केली आहे. ते त्यास, “आम्ही कोण आहोत हे सांगणारा विषाणू”, असे म्हणतात. त्यांच्या “विज्ञान आणि तंत्रज्ञानातील समस्या” मध्ये पोस्ट केलेल्या, त्यांच्या लेखातील एक उतारा येथे आहे:
जगातल्या सर्व देशांना एक परिक्षा द्यावी लागत आहे. एक नवा संसर्गजन्य विषाणू कसा नियंत्रणात आणावा ? अशी परिक्षा कधीतरी द्यावी लागणार आहे असं काही तज्ञांनी सांगितलं होतं, इतकंही सांगितलं होतं कीहा कोरोना जातीचा विषाणू असू शकतो. पण सर्व विषाणू हे शेवटी वेगळे असतात, त्यामुळे ही एका अर्थाने पूर्वकल्पना न देता घेतलेली परीक्षा होती. चीनने प्रथम याची परीक्षा दिली, चीन प्रथम गोंधळून गेलं, जगापासून वास्तव लपवण्याचा प्रयत्न केला, आणि परिक्षेचा पहिला टप्पा नापास झालं. पण त्यानंतर झपाट्याने स्वतःला दुरुस्त करून जणू चमत्कार घडवला. कसं ? कोट्यावधी लोकांची दिनचर्या आणि दैनंदिन जीवनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती कारवाई करून, दोन-दोन दिवसांत मोठी रुग्णालये तयार करुन, चार तासांत निदान देणाऱ्या चाचण्या विकसित करुन, वैद्यकीय सेवा कर्मचार्यांची फौज बाधित भागात हलवून आणि वेगाने या आजाराला समजून घेऊन – म्हणजे रोगाची साथा नियंत्रणात आणण्यासाठी व उपचाराचे सर्व महत्वाचे घटक लागू करून.आणि म्हणूनच आता असे दिसते की चीनने साथीच्या प्रसार थांबवला आहे.
पुढे ते दक्षिण कोरियाच्या कामगिरीवर इतर देशांशीही चर्चा करतात. परंतु अमेरिकेने त्याच्या लेखाचे लक्ष केंद्रित केले आहे कारण दक्षिण कोरियापेक्षा आता आपल्याकडे(अमेरिकेत)जवळपास दहा पट जास्त प्रकरणे आहेत. अमेरिका हा कोरोनाव्हायरस केंद्रबिंदू आहे. परंतु जर आम्ही दक्षिण कोरियाने घेतलेल्या मार्गाचा अवलंब केला असता तर असे झाले नसते. कूपरच्या लेखाचा भाग वाचण्यासारखा आहे. येथे एक दुवा आहे . परंतु ज्यांना हे वाचण्याचा त्रास होत नाही त्यांच्यासाठी रॉबर्ट कूपरने आमच्या परिस्थितीचे आकलन करणे अत्यंत वाईट आहे.
रॉबर्ट कूपर यांच्या असा विश्वास आहे की व्हायरसच्या आमच्या हाताळणीतून “आम्ही कोण आहोत”, हे प्रतिबिंबित होते. ते म्हणतात, की आतापर्यंत आम्ही सर्व चुकीच्या गोष्टी केल्या आहेत. का ? कूपरच्या मते याचे कारण की आम्ही असेच झालो आहोत. कूपर म्हणतात, “ज्याप्रमाणे पूर्वीपासून रोगग्रस्त स्थितीत असणाऱ्या व्यक्तींना सर्वाधिक धोका असतो, त्याचप्रमाणे अमेरिकन समाज एक आजारी समाज आहे – सामाजिक आजार आणि दुर्लक्षित संस्थांची एक लांब, कुरूप यादी इथे आहे. कोविड -१९ ही केवळ कठोर परीक्षा नाही; हा आपल्या समाजाचा आरसा आहे. ”
यापुढे मी अधिक काय बोलू.
भाषांतर – निश्चय
(अनुवादक सॉफ्टवेअर इंजिनिअर असून लोकायत ह्या सामाजिक संघटनेत कार्यरत आहेत.)
[email protected]