हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळबागा व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांचा तीन दिवसांचा दौरा सुरु आहे. या दरम्यान देवगड येथे फडणवीसा यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावला. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आले नाही असे म्हणता मग तुमचा दोन जिल्ह्यांचाच दौरा का? सातारा, कोल्हापूर, सांगली येथेही नुकसान झाले आहे. त्या ठिकाणचे नुकसान दिसत नाही का? असा सवाल फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंना विचारला.
मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रत्नागिरी व सिधुदुर्ग जिल्ह्यांचा पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहेत. दुसरीकडे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर हेही याच जिल्ह्यात तीन दिसावसांपासून ठाण मांडून आहेत. यादरम्यान आज फडणवीस यांनी देवगडला भेट दिली. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी फडणवीसांनी काही प्रश्नही मुख्यमंत्री ठाकरेंना विचारले आहेत. त्यामध्ये आम्ही तीन दिवसांपासून या ठिकाणी आहोत. आम्ही या दरम्यान पत्रे व इतर साहित्यही नुकसान झालेल्या कोकणवासीयांना देऊन मदत केली आहे. मात्र, तुम्ही कधी मदत जाहीर करणार हे सांगावे? कोकण व सिंधुदुर्गप्रमाणे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणीही शेतकऱ्यांच्या शेतीचे, घरांचे नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी आपण का गेला नाही? केवळ दोनच जिल्हे आपल्याला दिसले का? असे अनेक प्रश्न फडणवीस यांनी ठाकरेंना विचारीत टोला लगावला आहे.