Saturday, January 28, 2023

राहुल गांधींनी हात का पकडला? अभिनेत्री पूनम कौरने सांगितलं कारण

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । तेलंगणामध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी अभिनेत्री पूनम कौरचा हात धरल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोवरून भाजपने राहुल गांधींवर टीका केल्यांनतर आता खुद्द पूनम कौर हिनेच या फोटो मागील कहाणी सांगितली आहे तसेच राहुल गांधी यांनी आपला हात का धरला हे सुद्धा स्पष्ट केलं आहे.

भारत जोडो यात्रेत चालताना आपण घसरलो आणि पडलो असतो तेव्हा पडताना वाचवण्यासाठी राहुल गांधींनी आपला हार धरल्याचं कौर यांनी म्हटलं. त्यामुळे अशा प्रकारे टीका करणे हा तुमचाच पूर्णपणे अपमान आहे. पंतप्रधान महिला शक्तीबद्दल बोलले होते लक्षात ठेवा असं म्हणत पूनम कौर हिने टीकाकारांचा समाचार घेतला आहे.

- Advertisement -

दरम्यान, उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनीही पूनम कौर यांच समर्थन केलं आहे .पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या स्त्रिया देशाला पुढे नेण्याची प्रेरणा देतात, असे तुमचे म्हणणे असेल, तर पंडित नेहरूंचेच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे समान भारताचे स्वप्नही साकार होईल असं त्या म्हणाल्या.

भाजपची टीका नेमकी काय ?

भाजप नेत्या प्रीती गांधी यांनी राहुल गांधी आणि पूनम कौर यांचा हातात हात दिलेला फोटो शेअर केला आणि राहुल गांधी आपल्या पणजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत अशी बोचरी टीका केली होती. यांनतर काँग्रेस खासदार जोतिमणी यांनीही त्यांच्यावर निशाणा साधत प्रीती गांधी एका विचारसरणीच्या बळी आहेत, जी महिलांना या पातळीवर नेऊ शकते अशी टीका केली.