हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच मी अध्यक्ष राहणार. तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर पक्ष उभा केला आहे. त्याला १८ वर्ष झाली आहेत. कुठल्या पक्षाचा प्रमुख होणार ही गोष्ट माझ्या मनाला शिवतही नाही, गुढी पाडवा मेळाव्याला शिवसैनिकांच्या समोर राज ठाकरेंनी हे स्टेटमेंट करुन अनेक चर्चांना पुर्णविराम दिला. राज ठाकरे (Raj Thackeray) येत्या काळात शिवसेनाप्रमुख बनतील. शिवसेना हा पक्ष ते ताब्यात घेतील. शिवसेनेला पुन्हा एकदा ठाकरेंचा वारसा मिळणार.. अशी काही या चर्चांची एकंदरित बॉमटमलाईन… राज ठाकरे यांचं नेतृत्व, त्यांच्या मागे असणारा लोकांचा जनाधार आणि शिवसेनेतच राजकारणाचं बाळकडू पिलेल्या राज ठाकरेंसाठी तशी ही गोष्ट सोपी आहे. पण २००५ साली शिवसेनेतून बाहेर पडताना आणि शिंदे – राज ठाकरे यांची जवळिक वाढल्यानंतरही शिवसेनेवर दावा करण्याचा त्यांना फुल चान्स असताना त्यांनी असं का केलंं नाही? शिवसेनेत असताना राजकारणापासून साईडलाईन केलंं जात असल्यानं.. पक्षाची लिडरशीप दिली जात नसल्यानं… नाराज झालेल्या राज ठाकरेंनी स्वत: चा मनसे पक्ष स्थापन केला. मात्र शिंदेंसारखी बंडाळी केली नाही. तसं पाहायला गेलं तर शिंदेंच्या बंडाळीला गद्दारी म्हणण्यात आलं तर याउलट जर का हेच पाऊल राज ठाकरेंनी उचललं असतं, तर ठाकरेंच्या कुटुंबातला एक चेहरा म्हणून ही कृती रिलेवंट ठरली असती. त्यामुळे खरंच आपल्या दमदार भाषणांनी, आंदोलनांनी भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या राज ठाकरेंना शिवसेना फोडण्याचा चान्स कसा होता? शिंदेंच्या मदतीने ते शिवसेनेवर अजूनही दावा करतील का?
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी आपल्या भारदस्त आवाजात तो किस्सा सांगितला… राज ठाकरे म्हणाले, मी शिंदेंच्या शिवसेनेचा प्रमुख होणार अशी बातमी आली. खरंतर मला शिवसेना प्रमुख व्हायचंच असतं तर मी तेव्हाच झालो असतो. ३२ आमदार, ७ खासदार तेव्हा माझ्यासोबत बैठकीला होते. मी काँग्रेसमध्ये जातोय की काय असं त्यांना वाटत होतं. पण मला पक्ष फोडून कुठलिही गोष्ट करायची नव्हती. स्वत: चा राजकीय पक्ष काढेन, पण कुणाच्या हाताखाली काम करणार नाही. अशा कोणत्याही अफवा असतील तर त्यावर विश्वास ठेऊ नये. राज ठाकरेंच्या या वक्तव्यानं राज ठाकरे शिवसेनाप्रमुख होणार याकडे डोळेे लावून बसलेल्या अनेकांचा मूड हाफ झाला. तर दुसरीकडं शिवसेना फोडण्यात ठाकरेंना काडीचाही इंटरेस्ट नसल्याची बॉटमलाईन पुन्हा समोर आली.
पण राज ठाकरेंनी शिवसेना फोडली नाही याची जी काही प्रमुख कारणं सांगता येतील त्यातलं पहिलं म्हणजे पक्षात बंड करण्याच्या तेव्हाच्या प्रचलित पद्धती
राज ठाकरेंच्या आधी शिवसेनेत बरीच बंड झाली होती. पहिलं बंड होतं नारायण राणे यांचं. राणेंनी शिवसेनेतून बाहेर पडत आपल्या काही समर्थक आमदारांना सोबत घेत काँग्रेस गाठली… यानंतर छगन भुजबळ यांनाही सेम टू सेम रिपीट कॅसेट गिरवली. यानंतर मात्र जेव्हा राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडण्याची वेळ आली तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. २७ नोव्हेंबर २००५ ला आपल्या कृष्णकुंज या राहत्या घरी त्यांनी पत्रकार परिषद घेत, आपण शिवसेनेतून बाहेर पडत नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची भूमिका बोलावून दाखवली. उद्धव ठाकरेंंवर असणरी नाराजी, पक्षातील वाढती नाराजी, बड्या नेत्यांंनी शिवबंधन सोडल्याचे अनेक संदर्भ या निर्णयाला होते. खरंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्याध्यक्ष करण्याचा ठराव स्वत: राज ठाकरे यांनीच वाचून दाखवला होता. पुढे मात्र राज ठाकरेंना पक्षातून साईडलाईन केलं जात असल्याचं आणि पक्ष संघटनेपासून त्यांना लांब ठेवलं जात असल्यानं नाराज झालेल्या राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडत नवा पक्ष स्थापन केला. त्यांच्यासोबत काही खासदार, आमदारांचं समर्थनही त्यांच्या बरोबर होतं, मात्र त्यांनी शिवसेनेत फूट पडू दिली नाही. कारण पक्षात फूट पाडण्याची प्रथा महाराष्ट्राच्या राजकारणात अस्तित्वात नव्हती. अगदी अलिकडे एकनाथ शिंदे यांचं बंड होण्याच्या आधी पर्यंत तुमचं पक्षासोबत पटलं नाही तर पक्षातील समर्थक आमदारांना घेऊन सत्ताधारी पक्षात जाणं, राजिनामा देऊन स्वतंत्र राहणं किंवा स्वतंत्र पक्ष काढणं… याच पर्यांयाचा विचार केला जायचा. त्यानुसार राज ठाकरेंनी रेल्वेच्या इंजिनाला गती दिली. पण कधी शिवधनुष्य चोरण्याचा विचार त्यांच्या मनाला देखील शिवला नाही.
यातला दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे राज ठाकरेंच्या बंडाचा भावनिक मुद्दा…
राज ठाकरेंंनी शिवसेना सोडण्यामागचा मुख्य भाग हा भावनिकतेचा होता. आपली योग्यता असतानाही आपल्याला पक्षात योग्य ती वागणूक दिली जात नाहीये. बाळासाहेबांवरची असणारी आपली उघड नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यांनी ते पाऊल उचललं होतं. शिंदेंच्या बाबतीत हा सगळा खेळ पॉवर पॉलिटीक्सचा होता. उद्धव ठाकरेंमुळे शिंदेंना मुख्यमंत्री पदाला मुकावं लागलं होतं. त्यामुळे शिंदेंची थेट स्पर्धा ही उद्धव ठाकरेंबरोबर होती. तर अजितदादांचीही स्पर्धा शरद पवारांसोबत होती. राज ठाकरेंच्या बाबतीत गणित मात्र वेगळं होतं. त्यांची स्पर्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत नव्हती. माझं भांडण विठ्ठलासोबत नसून त्यांच्या आसपास असणाऱ्या बडव्यांसोबत आहे, असं स्वत: राज ठाकरेंनीही बोलून दाखवलं होतं. बाळासाहेबांना ते तेव्हा आणि आजही आपले मार्गदर्शक मानतात. त्यामुळे त्यांच्या हयातीत हा पक्ष फोडण्याची कल्पनाच करणं तेव्हा मुर्खपणा ठरला असता.
शिवसेना फोडली नाही याचं पुढचं कारण येतं ते म्हणजे काका – पुतण्याचं असणारं नातं
राज ठाकरेंच्या आयुष्यावर त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांचा फार मोठा प्रभाव राहिला. त्यांनीच बाळकडू पाजत राज ठाकरे यांना राजकारणात आणलं, राजकारणातील पदं दिली. राज ठाकरे हे तसे तेव्हाच्या शिवसेनेचे स्टार नेते म्हणून नावारुपास आले होते. तेच पुढेे जाऊन कार्याध्यक्ष बनतील. असंही सगळ्यांना वाटलं होतं. पण बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमापोटी राज ठाकरेंवर अन्याय झाला. यामुळेच पक्षात असूनही राज ठाकरे नाराज होतेच पण सोबतच त्यांना अतिव दु:खही झालं होतं. त्यामुळे पक्षातून बाहेर पडत स्वत: चा पक्ष काढत नेतृत्व सिद्ध करणं, त्यांना महत्वाचं वाटलं. शिवसेनेला नख लावण्याचा, आमदार – खासदार पळवण्याची कुठलिही पार्श्वभूमी त्याला नव्हती. आधीच शिवसेना सोडल्याने बाळासाहेबांना झालेल्या दुख:ची कल्पना राज ठाकरेंना होतीच. त्यात पक्ष फोडण्यासारख्या गोष्टी करुन त्यांना अजून आपल्या काकाला दु:ख द्यायचं नव्हतं.
आता येऊयात शेवटच्या मुद्द्याकडे तो म्हणजे बंंडाळीचा टॅग
शिवसेनेत उभी फूट पडल्यावर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक शिवसैनिक नेत्यांवर गद्दारीचा टॅग बसला… त्यांच्या काही भावना कितीही प्रामाणिक आणि रास्त असल्या तरी त्यांच्या इमेजला बसलेला धक्का काही केल्या पुसला जाणारा नाहीये. आपल्यासोबतही असंच काहीसं होऊ नये, हा विचार असल्याने राज ठाकरेंनी शिवसेना फोडायचा कधी विचार आणि तसा कधी प्रयत्नही केला नाही. सध्याच्या घडीला शिंदेंच्या शिवसेनेची सूत्र हाती घेतली तरी तोच प्रोब्लेम आडवा येतो. आधीच शिंदेंनी शिवसेनेत पाडलेल्या फुटीच्या घटनेबद्धल लोकांच्या मनात असणारं परसेप्शन काही चांगलं नाहीये. त्यात आपण यात भाग घेतला तर उद्धव ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट आपल्यापण अंगावर येईल, ज्याची मोठी किंमत राज ठाकरेंना चुकवावी लागली असती. एवढंच नाही, तर इतक्या वर्षांनी वाढवून मोठ्या केलेल्या मनसेला असंच क्षणार्धात संपवणं प्रॅक्टीकली शक्य नव्हतं.
याच सगळ्या गोष्टींचा विचार करता शिवसेनेचं शिवधनुष्य उचलण्याची धमक असतानाही राज ठाकरे यांनी आपलं पॉलिटीकल करिअर रेल्वेच्या इंजिनाला गती देण्यातच खर्ची घातली. राज ठाकरेंचा शिवसेनेतला सहवास, बाळासाहेबांसोबतचे ऋणानुबंध, वेगळ्या वाटा निवडण्याकडे असणारा कल या सगळ्यांमुळे त्यांनी कधी शिवसेनेवर कधी दावा केला नाही..आणि शिवसेना बळकावण्याचा प्रयत्नही केला नाही…राज ठाकरेंच्या या भूमिकेबद्धल तुम्हाला काय वाटतं?