Tuesday, January 7, 2025

भारतातील लोक परदेशात स्थायिक का होतात? 5 वर्षात 3 लाख भारतीयांनी केले स्थलांतर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतामध्ये सगळ्या गोष्टी असतानाही लोक भारत देश सोडून परदेशात का स्थायिक होत आहे? असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. आता विरोधकांनी देखील सरकारला याबाबत जाब विचारलेला आहे. अनेक लोक बाहेर देशात जातात. परंतु त्यामध्ये खास करून अमेरिका ब्रिटन, फ्रान्स, युएस, सिंगापूर, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे. भारतातील सर्वाधिक लोक याच देशांमध्ये स्थायिक होत असतात.

भारतीयांची देश सोडण्याची मुख्य कारणे

क्वालिटी ऑफ लाईफ

अनेक लोकांना सुख सुविधा पाहिजे असतात. त्यामुळे लोक भारत सोडून इतर देशांमध्ये स्थायिक होतात. त्याचप्रमाणे अनेक लोकांच्या मते विदेशामध्ये त्यांना चांगले शिक्षण घेता येते. त्या आणि चांगले वातावरण देखील आहे. तसेच या ठिकाणी जास्त सुविधा असतात. आणि लाईफ अगदी सोपी असते. मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळते. त्यांचा स्टॅंडर्ड देखील सुधारतो. यामुळे अनेक लोक परदेशात स्थलांतर करतात.

रोजगाराच्या चांगल्या संधी

भारताच्या मान्याने बाहेरील देशांमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे बाहेर देशात वेतन देखील चांगले मिळते. म्हणूनच खास करून रोजगाराच्या दृष्टीने अनेक लोक भारतातून दुसऱ्या देशात स्थलांतर करतात. त्याचप्रमाणे परदेशामध्ये कामाचे वातावरण चांगले असतात. आणि कामाचे तास देखील ठरलेले असतात. तसेच कामाबाबत नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते.

करात सवलत

परदेशामध्ये भारताच्या मान्याने आर्थिक लाभ देखील चांगला असतो. आणि वातावरण देखील चांगले असते. त्यामुळे अनेक लोक विदेशात स्थायिक होतात. त्याचप्रमाणे बाहेरील देशांमध्ये कर सवलतीचा लाभ मिळतो. तसेच विविध सोयी सुविधा देखील मिळतात. म्हणून अनेक लोक परदेशात स्थायिक होतात.

दुहेरी नागरिकत्वाचा भारतात अभाव

भारतामध्ये दुहेरी नागरिकत्वाची कोणत्याही प्रकारे सोय नाही. त्यामुळे अनेक लोक परदेशात स्थायिक होतात. कारण त्यांना दुहेरी नागरिकाचा फायदा होतो. भारताने जर दुहेरी नागरिकत्वाची सोय केली, तर या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक लोक हे परदेशात जाऊन स्थायिक होतात.