हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाची अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2023) 22 एप्रिल 2023 रोजी आहे. अतिशय शुभ आणि साडेतीन मुहूर्ता पैकी एक असा अक्षय्य तृतीया सण देशभर अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. हिंदू आणि जैन धर्मामध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं. त्यामुळे या दिवशी सोने खरेदीसाठी ग्राहकांची चांगलीच झुंबड पाहायला मिळते. परंतु नेमकी अक्षय्य तृतीयेलाच सोनं खरेदी का केलं जातं? यामागील कारण काय आहे? हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर चला आज आम्ही तुम्हांला सांगतो.
पौराणिक कथेनुसार, ब्रह्मदेवाचा मुलगा अक्षय कुमारचा जन्म वैशाख शुक्ल तृतीया तिथीला झाला. म्हणूनच या तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात. हिंदू धर्मात असं म्हंटल जाते की अक्षय्य तृतीया तिथीला कोणतेही शुभ कार्य केले तरी त्याचे चतुर्थी फळ चिरकाल टिकते. त्यातच सोने हे लक्ष्मी मातेचे भौतिक रूप आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी केल्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि तिची कृपा आणि आशीर्वाद सदैव आपल्याला मिळतात अशी लोकांची धारणा आहे. त्यामुळे लक्ष्मीमाता घरामध्ये कायम राहावी आणि आपल्या घरात सुखसमृद्धी राहावी म्हणून अक्षय्य तृतीयेला लोक सोने खरेदी करतात.
अक्षय्य तृतीयेला सोन्याच्या खरेदी व्यक्तिरिक्त अशाही अनेक वस्तू आहेत ज्याची खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जाते. या दिवशी नवीन जमीन खरेदी किंवा बिल्डिंग खरेदी करणं, चांदीची भांडी, नवनवीन मशीन, किंवा फर्निचर अथवा कपडे खरेदी करणेही चांगलं असत. येव्हडच नव्हे तर जर तुम्ही शेअर मार्केट मध्ये इंटरेस्टेड असाल तर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करणे सुद्धा भाग्यदायी असते असे म्हटले जाते.