हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकच वाढत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या मनस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यांचे मित्र पक्ष लॉकडाऊन करायला एवढे उतावीळ झालेले नाहीत. पण मुख्यमंत्री चांगलेच उतावीळ झाले आहेत. कोरोना सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी ही घोषणा दिली. पण माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी पार पाडायला ते कमी पडले, कारण त्यांच्या घरातील पत्नी, मुलं सगळेच कोरोनाग्रस्त झाले. माझी जबाबदारी त्यांना पेलवलेली नाही. मुख्यमंत्र्यांचं धोरण चुकीचं असल्यानेच राज्यातील कोरोना कमी होण्याऐवजी वाढला, असा आरोप करीत भाजपचे नेते नारायण राणे यांनी सचिन वाझे प्रकरणावरून शिवसेनेवर निशाणा साधला.
भाजप नेते नारायण राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन, सचिन वाझे प्रकरण यावरून ठाकरे सरकारवर शरसंधान साधलंय. घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सचिन वाझेंवरही गंभीर आरोप केले. महिन्याला 100 कोटी जमवायचे आणि अनिल देशमुखकडे नेऊन द्यायचे ही सचिन वाझेवर जबाबदारी होती, सचिन वाझे नेमका कोणासाठी काम करत होता. जनतेच्या सुरक्षेसाठी की मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पैसे पुरवण्यासाठी काम करत होता. एनआयएच्या चौकशीतून खरी गोष्ट लवकरच बाहेर येईल. युनूस या अतिरेक्याच्या हत्येतही वाझेचा समावेश होता. एक एपीआय सचिन वाझे ओबेरॉयमध्ये राहू शकतो. तो जिथे राहायचा त्या ओबेरॉयच्या कॅमेऱ्यामध्ये एका बाईचा फोटो आहे. ती भाईंदरला राहणारी आहे. एनआयएनं तिच्या भाईंदरच्या घरीही छापा मारला. ती बाई आणि ओबेरॉयमध्ये येणारी बाई सारखीच आहे. ती बाई वाझेसोबत कोणतं काम करत होती? असा सवालही राणेंनी उपस्थित केला.
राणे यांनी सांगितलं कि मुख्यमंत्र्यानी नागरिकांना, लोकांना मानसन्मान देऊन त्यांच्याशी बोलायला हवं. आता दिवसा नाही रात्री लॉकडाऊन करणार आहेत. माणसं दिवसभरातून काम करून संध्याकाळी घरी जातात. मी मातोश्रीमध्ये बसतो, तुम्ही आपल्या घरात बसा, मग जेवायची सोय काय आपली?, तुम्ही जेवायची व्यवस्था सगळी येते. कोरोनामुळे सरकारनं नाक कापलंच, पण महाराष्ट्र राज्य आर्थिक बाबतीत मागे गेले. मुख्यमंत्री आणि या सरकारमुळे राज्य अधोगतीकडे गेलेय. लॉकडाऊन राज्याला आता पेलवणारं नाही. सगळे उद्योगपती आज कोलमडलेत, याची चिंता यांना आहे की नाही?’, असा सवालही नारायण राणेंनी उपस्थित केला आहे.