हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओडिशाच्या किनारपट्टी भागात अम्फान चक्रीवादळ येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने आधीच वर्तविली आहे. गेल्या काही तासांत तर या अम्फान चक्रीवादळाने एक भयंकर वळण घेतले आहे. दक्षिण-पश्चिम बंगालच्या खाडीपासून उत्तर-पश्चिमोत्तर भागाकडे या चक्रीवादळाने ताशी सहा किलोमीटर वेगाने वाटचाल केली आहे. त्याच वेळी, येत्या १२ तासांत हे चक्रीवादळ अधिक तीव्र होऊ शकते, असा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे.
भारतीय हवामान खात्याने अलीकडेच चक्रीवादळांच्या १६९ नवीन नावांची यादी जाहीर केली आहे, जी भविष्यात बंगालचे उपसागर आणि अरबी समुद्रात येऊ शकतात. जगभरातील महासागरांत येणाऱ्या चक्रीवादळांना क्षेत्रीय विशेष हवामान विभाग आणि ट्रॉपिकल साइक्लोन वॉर्निंग सेंटरतर्फे नावे दिली जातात.
जगात सध्या सहा प्रादेशिक विशेष हवामान खाती (एक भारतातील) आणि पाच ट्रॉपिकल साइक्लोन वॉर्निंग सेंटर आहेत. प्रादेशिक विशेष हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तर हिंद महासागरात येणाऱ्या चक्रीवादळाला नाव एका प्रक्रियेद्वारे दिले जाते. हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रात येतात. चक्रीवादळ येण्यापूर्वी हवामान विभाग आसपासच्या १२ देशांना याविषयीची माहिती देतो.
चक्रीवादळाला नाव कसे ठेवले जाते ?
२००० साली मध्ये काही देशांनी जागतिक हवामान विभाग किंवा संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक आयोगासाठी आशिया आणि पॅसिफिक नावाचा एक गट स्थापन केला होता. या गटात बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड यांचा समावेश आहे.
यावेळी या देशांच्या गटाने असे ठरवले की कोणत्याही चक्रीवादळाचे नाव त्याच्या उत्पत्ती वाल्या प्रदेशाच्या नावावर असेल. प्रत्येक देश आपल्याकडून १ ट्रॉपिकल चक्रीवादळ पॅनेल सुचवितो. २०१८ मध्ये या गटात इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या आणखी पाच देशांचा समावेश करण्यात आला.
हवामान खात्याने ही यादी गेल्या महिन्यातच एप्रिलमध्ये जाहीर केली होती, म्हणजे यामध्ये १३ देशांच्या १३ सूचनांचा समावेश होता. या नव्या यादीमध्ये चक्रीवादळ अम्फानचाही समावेश आहे कारण याआधीच्या यादीमध्ये हे नाव वापरलेले नव्हते.
चक्रीवादळाला नाव देणे महत्वाचे का आहे ?
चक्रीवादळाचे नाव ठेवल्याने लोकांना त्याला लक्षात ठेवणे सोपे जाते. याशिवाय वैज्ञानिक, मीडिया आणि आपत्ती व्यवस्थापन यासारख्या संस्थांना देखील या नावाने मदत होते. नाव ठेवल्याचा देखील एक फायदा आहे की यामुळे चक्रीवादळाला ओळखणे सोपे जाते. चक्रीवादळाला नाव दिल्याने लोकांमध्ये जागरूकता तसेच धोक्याच्या तयारीसाठीचे इशारे देणेही सुलभ होते. एकाच भागात चक्रीवादळ येताना भिन्न नावे ठेवल्यास उडणाऱ्या गोंधळाच्या परिस्थतीची भीतीही यामुळे दूर होते.
चक्रीवादळाला नाव देण्यासाठी कोणती मार्गदर्शक तत्त्वे आहेत ?
चक्रीवादळाला नाव देण्यासाठी काही नियम बनविण्यात आले आहेत, ज्याचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास, ट्रॉपिकल साइक्लोन वॉर्निंग पॅनेल हे देशांनी दिलेली नावे स्वीकारत नाही.
कोणती मार्गदर्शक तत्त्वे आहेत ?
चक्रीवादळाचे प्रस्तावित नाव राजकारण, राजकीय विचारसरणी, धर्म, संस्कृती याविषयी निष्पक्ष असले पाहिजे.
प्रस्तावित नाव असे असावे की ज्यामुळे जगातील कोणत्याही समुदायाच्या भावना दुखू नयेत.
प्रस्तावित नाव असभ्य किंवा अमानुष असू नये.
हे नाव लहान, उच्चारायला सोपे असावे आणि कोणत्याही सदस्याच्या मूलभूत भावनांना इजा पोहोचू नये.
नावात आठ अक्षरांची कमाल मर्यादा असावी.
नाव व्हॉईस ओव्हरमध्ये रेकॉर्ड करून किंवा योग्य उच्चारणासह पाठविले जावे.
भारताने प्रस्तावित केलेली नावे कोणती आहेत ?
भारताकडून नव्या यादीमध्ये चक्रीवादळाची १३ नावे प्रस्तावित केली गेली आहेत. भारताने दिलेली काही नावे सर्वसामान्यांनी सुचविलेली आहेत. ट्रॉपिकल साइक्लोन पॅनेलला नाव देण्यापूर्वी या नावांचा आढावा घेण्यासाठी भारतीय हवामान विभागाने एक समिती स्थापन केली आहे.
भारताने दिलेली १३ नावे पुढीप्रमाणे आहेत:
गति
तेज
मुरासू
आग
व्योम
झार
प्रवाह
नीर
प्रभंजन
घुरनी
अंबुद
जलधि
वेग
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.