हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी नेते संभाजी भिडे यांनी अयोध्येच्या राम मंदिरात रामाच्या मूर्तीला मिशा लावण्याची मागणी केली आहे. रामाच्या मूर्तीला मिशा न लावण्यात कलाकारांची चूक असून ती सुधारली पाहिजे असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच राम मंदिरात मूर्तीला मिशा नसतील तर माझ्यासारख्या भक्तासाठी त्या मंदिराचा काहीच अर्थ नसे असेही ते म्हणाले आहेत. संभाजी भिडे यांनी जरी रामाच्या मूर्तीला मिशी लावण्याची मागणी केली असली तरी आपण पहिले तर हिंदू धर्मात ब्रम्हदेव सोडले तर इतर कोणत्याही देवतांच्या सामान्यतः मिशा नाही आहेत. काही ठिकाणी शंकराच्या मूर्तीला मिशा आहेत मात्र विष्णू, कृष्ण, राम आणि इतर देवतांच्या मिशा पाहायला मिळालेल्या नाहीत. असे मानले जाते की ईश्वर चिरतरुण असतात म्हणून त्यांच्या मूर्ती अथवा फोटोला मिशा नसतात.
संभाजी भिडे यांनी राम, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्तींना मिशा नसण्याचे कारण कलाकारांची चूक असल्याचे म्हंटले आहे. राम प्रेरणादायी आणि पुरुष देवता आहेत. लक्ष्मण आणि हनुमान हे देखील पुरुष देवता आहेत. अशामध्ये त्यांना मिशा नसणे ही चित्रकार आणि मूर्तिकार यांची चूक असल्याचे ते सांगतात. स्वतः मोठ्या दाट मिशा असणाऱ्या भिडेंनी जर मूर्तीला मिशा नसतील तर माझ्यासारख्या अनुयायांना या मंदिराचे काहीच महत्व राहणार नसल्याचे सांगितले आहे. आणि ही ऐतिहासिक चूक असल्याचेही ते म्हणाले आहेत. त्यांच्या विधानानुसार विचार केल्यास केवळ पुरुष देवता असल्याने मिशी गरजेची असल्याचा निष्कर्ष निघतो आहे.
या सर्वात राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्रदास यांनी संभाजी यांची मागणी चुकीचे असल्याचे म्हंटले आहे. त्यांनी, ‘राम, कृष्ण आणि शंकर यांना षोडषवर्षीय अर्थात १६ वर्षाचे देव मानले जात असल्याने त्यांना मिशी नसते’ असे म्हंटले आहे. ‘राम-कृष्ण आणि शंकर हे हिंदू धर्मांतील प्रसिद्ध देव मानले जातात. याशिवाय पंचमुखी ब्रम्हदेव यांचे वय सीमित मानले जाते. मात्र रामाला नेहमी तारुण्यावस्थेतच पुजले जाते’ असेही ते म्हणाले आहेत. सोबतच जर भिडे अशी मागणी करत आहेत त्यांना पूर्ण माहिती नाही आहे आणि जर मिशीवाली मूर्ती कुठे असेल तर त्यांच्यासारख्या अज्ञानी लोकांनीच ती बनवली असेल असे ते म्हणाले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.