नवी दिल्ली । मंगळवारनंतर बुधवारी देखील भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्स 1016 हून जास्त अंकांनी वाढून 58,649 अंकांवर पोहोचला तर निफ्टी सुमारे 293 अंकांनी वाढून 17,469 च्या पातळीवर पोहोचला. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की, सलग दुसऱ्या दिवशी बाजाराचा रंग हिरवा का झाला ? यामागे 5 प्रमुख कारणे आहेत.
1. RBI च्या आर्थिक धोरणात कोणताही बदल झालेला नाही
RBI च्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) बुधवारी कोणताही बदल न करता रेपो दर 4% वर कायम ठेवला. त्यासोबतच ‘उदारमतवादी’ धोरणाची भूमिका कायम ठेवली. RBI ने देखील रिव्हर्स रेपो रेट 3.35% वर कायम ठेवला आहे. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) दर देखील 4.25% वर कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बाजाराला दिलासा मिळाला आहे. याशिवाय, अलीकडेच सरकारने अर्थव्यवस्थेशी संबंधित डेटा जारी केला होता, त्यानुसार एकूण 22 निर्देशकांपैकी 19 निर्देशकांनी मजबूत रिकव्हरी दर्शविली आहे. अर्थव्यवस्था झपाट्याने कोरोनापूर्व पातळीवर परत येण्याचे हे लक्षण आहे.
2. कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळे मजबूत जागतिक सिग्नल
अमेरिकेतील सर्वोच्च सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. अँटोनी फौसी यांनी कोरोना विषाणूचे नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन जास्त गंभीर असण्याची शक्यता नाही, अशी कमेंट केल्यानंतर या नवीन व्हेरिएंटच्या आर्थिक परिणामाविषयी बाजारातील चिंता दूर झाल्या आहेत. मंगळवारी सर्व प्रमुख यूएस निर्देशांक मजबूत वाढीसह बंद झाले.
न्यूयॉर्कचा डाऊ जोन्स औद्योगिक सरासरी इंडेक्स 1.4 टक्के वाढला, तर S&P 500 2.07 टक्के आणि Nasdaq Composite 3.03 टक्के वधारला. मंगळवारी युरोपीय बाजारही तेजीसह बंद झाले. दरम्यान, आशियातील इतर प्रमुख शेअर बाजारांमध्ये बुधवारी शांघाय, सोल आणि टोकियोमध्ये ग्रीन मार्कवर ट्रेंड करताना दिसून आले.
3. सर्व क्षेत्रात खरेदीमुळे सकारात्मक व्यवसाय
निफ्टीच्या सर्व सेक्टरमध्ये सुमारे 1% ची वाढ दिसून येत आहे. आयटी शेअर्स मध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. दिवसाच्या ट्रेडिंगमध्ये निफ्टी आयटी इंडेक्स सुमारे 2 टक्क्यांनी वधारला. यानंतर फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि बँकिंग इंडेक्समध्ये 1.5 टक्क्यांनी वाढ झाली. मीडिया इंडेक्स 1.2% बंद झाले तर Metus, Auto, FMCG आणि फार्मा इंडेक्स जवळपास 1% च्या वाढीसह बंद झाले.
4. TA’ZIZ सह रिलायन्स इंडस्ट्रीजचे JV
बेंचमार्क इंडेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सना सर्वाधिक वेटेज आहे. अबू धाबी-बेस्ड TA’ZIZ सोबत Ruwais मध्ये 2 अब्ज डॉलर्स किंमतीच्या केमिकल प्रोजेक्ट्ससाठी जॉईंट व्हेंचरची घोषणा केल्यानंतर बुधवारी रिलायन्सचे शेअर्स 2% वाढले. या जॉईंट व्हेंचरद्वारे कंपनी 2 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसह क्लोर-अल्कली, इथिलीन डिक्लोराईड (EDC) आणि पॉलीविनाइल क्लोराईड (PVC) प्रॉडक्शन फॅसिलिटी तयार करेल आणि ऑपरेट करेल.
5. टेक्निकल व्यू: डाउनसाइडवर मजबूत सपोर्ट
Hem Securitiesचे PMS चे प्रमुख मोहित निगम म्हणाले, “तांत्रिक आघाडीवर 17,500 ही निफ्टी-50 साठी महत्त्वाची रेझिस्टन्स पातळी आहे, जी पार करणे थोडे कठीण असू शकते. दुसरीकडे, जेव्हा ते खाली येते तेव्हा 16,900 ची पातळी त्याच्यासाठी मजबूत आधार म्हणून काम करू शकते. त्याचप्रमाणे, बँक निफ्टीसाठी मुख्य रेझिस्टन्स लेव्हल आणि सपोर्ट लेव्हल अनुक्रमे 37,300 आणि 35,500 आहेत.” HDFC Securities रिटेल रिसर्चने म्हटले आहे की, “निफ्टीचा 15 मिनिटांचा फ्युचर्स चार्ट दाखवतो की, चॅनल ब्रेकआउटनंतर इंडेक्स झपाट्याने वाढला आहे. हे एक पॉझिटिव्ह लक्षण आहे.”