भाजपकडून साताऱ्याची पुढची खासदारकी रणजितसिंह निंबाळकरांना : विक्रम पावसकर

सातारा | नगरपंचायत निवडणुकांच्या निमीत्ताने सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला पहायला मिळत आहे. मंगळवारी फलटण तालुका भाजपा संपर्क कार्यालयाचं उदघाटन झालं. यावेळी बरीच राजकीय बँटींग झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी एक मोठं विधान केले आहे. माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर हे पुढच्याळी साता-याचे खासदार व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली.

या कार्यक्रमास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी  जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी हे विधान केले आहे. खासदारकीसाठी हे विधान खुप मोठ मानलं जात आहे. कारण साता-याचे आत्ताचे खासदार राष्ट्रवादी श्रीनिवास पाटील असले तरी त्यांच्या विरोधात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपातून निवडणुक लढविली होती. उदयनराजेंचा या ठिकाणी मोठा पराभव झाला होता. उदयनराजे भोसले हे आत्ता भाजपाचे राज्यसभेचे खासदार आहेत असं असताना पावसकरांनी केलेल्या या विधानाला एक वेगळं महत्व प्राप्त झालय.

भाजपात सगळं अलबेल चाललंय असं काही या विधानावरुन दिसत नाही. सातारा जिल्हा भाजपाला आता उदयनराजे नकोत का असा सवाल, आता अनेकांना पडू लागला आहे. राष्ट्रवादी मधुन खासदार झालेल्या उदयनराजेंनी भाजपातील काही नेत्यांच्या आग्रहास्तव स्वत:ची खासदारकी सोडून अगदी सहा महिन्यात दुस-यांदा निवडणुक लढविली. भाजपाच्या आग्रहा खातर हातातली सत्ता सोडून भाजपवासी झालेल्या उदयनराजेंना भाजपातीलच लोक आता डावलायला लागल्याचं चित्र आहे. पुढील लोकसभेच्या निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीची मागणी करुन भाजपा जिल्हाध्यक्षांनी एका वेगळ्याच वादाला तोंड फोडलय ही मागणी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे. यामुळे याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील राजकीय जाणकार पहात आहेत.