नवी दिल्ली । SpaceX चे मुख्य कार्यकारी अधिकारी Elon Musk ची सॅटेलाइट इंटरनेट सेवा स्टारलिंक (Starlink) येत्या काही काळात फ्लाइटमध्ये वाय-फाय देऊ शकेल. यासाठी कंपनी अनेक विमान कंपन्यांशी चर्चा करीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार 2018 पासून SpaceX ने सुमारे 4,400 पैकी 1,800 स्टारलिंक सॅटेलाइट्स (Starlink Satellites) लॉन्च केल्या आहेत. ब्रॉडबँड इंटरनेट कव्हरेज मुख्यतः ग्रामीण कुटुंबांसाठी आहे जिथे फायबर कनेक्शन उपलब्ध नाहीत. परंतु स्टारलिंक आता एअरलाइन्समध्येही विस्तारित केली जात आहे, कारण या वर्षाच्या शेवटापर्यँत SpaceX ने व्यावसायिकपणे ब्रॉडबँड नेटवर्क उघडण्यासाठी धावपळ सुरु केली.
SpaceX द्वारे डिझाइन केलेले आणि तयार केलेले एव्हिएशन हार्डवेअर वापरणार
बुधवारी स्टारलिंकचे कमर्शियल सेल्स उपाध्यक्ष जोनाथन हॉफलर यांनी कनेक्टिव्ह एविएशन इंटेलिजेंस समिटमध्ये सांगितले की, “आम्ही अनेक विमान कंपन्यांशी चर्चा करीत आहोत. आमच्याकडे विकासातील आमचे स्वतःचे विमान प्रोडक्ट आहे. SpaceX च्या एअरलाईन अँटेन्याचे डिझाइन ग्राहकांच्या टर्मिनल्ससाठी आहे.” एव्हिएशन हार्डवेअर SpaceX द्वारे डिझाइन आणि तयार केले जाईल .एरिअल अँन्टेना स्टारलिंक सॅटेलाइट्सशी संचार करण्यासाठी ग्राउंड स्टेशनशी कनेक्ट होऊ शकते.
यावर्षी इंटरनेटचा वेग 300 एमबीपीएस असेल
गेल्या वर्षी, SpaceX ने पाच गल्फस्ट्रीम जेटवर स्टारलिंकची चाचणी घेण्याची योजना दाखल केली होती आणि मार्चमध्ये त्यांनी यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनला कार, ट्रक, जहाजे आणि विमानांसह सिग्नल मिळवणार्या वाहनांसह स्टारलिंक वापरण्याची मान्यता देण्याची मागणी केली. गेल्या महिन्याच्या सुरूवातीस, एलन मस्कने देखील जाहीर केले की,”नवीन स्टारलिंक इंटरनेट सेवा भारतासह जगभरातील दुर्गम भागातील लोकांसाठी वेब एक्सेस अधिक चांगल्या स्वरूपात करेल. यावर्षी सॅटेलाइट ब्रॉडबँड कंपनी इंटरनेटचा स्पीड दुप्पट 300 एमबीपीएस करेल.”
12,000 उपग्रहांच्या नेटवर्कद्वारे हाय स्पीड इंटरनेट उपलब्ध करण्याची योजना
कंपनी सध्या स्टारलिंक प्रोजेक्टसाठी 50 ते 150 एमबीपीएस दरम्यान स्पीड देण्याचे वचन देते, जे सुमारे 12,000 सॅटेलाइट्सच्या नेटवर्कद्वारे हाय-स्पीड इंटरनेट देण्याची योजना आहे. कंपनीने यापूर्वीच आपल्या स्टारलिंक सॅटेलाइट्स पैकी 1,200 हून अधिक सॅटेलाइट्स कक्षामध्ये ठेवलेले आहेत. SpaceX सध्या 99 डॉलरच्या पूर्णपणे परत करण्यायोग्य डिपॉझिट्स द्वारे भारतात प्री-ऑर्डरवर स्टारलिंकची बीटा आवृत्ती ऑफर करीत आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा