नाना पटोलेंची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वकांक्षा, अजित पवार म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी मध्ये वाटेकरी असूनही आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच मुख्यमंत्रिपदाबाबतची महत्वाकांक्षा जाहीरपणे व्यक्त केली होती. त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली.

अजित पवार म्हणाले, नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आपला पक्ष वाढावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली असेल तर स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. उद्या तुम्हालाही रिपोर्टरपदावरुन चिफ एडिटर केलं तर आवडणार नाही का? प्रत्येकाल महत्वाकांक्षा असते. पण शेवटी पक्षाचे प्रमुख म्हणून जे व्यक्ती आहेत. ते निर्णय घेत असतात.

नाना पटोले नेमकं काय म्हणाले होते –

आम्ही आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवणार आहेत. हाय कमांडने निर्णय घेतल्यास मी मुख्यमंत्रीपदासाठी तयार आहे असे विधान महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांनी केलं होतं.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like