औरंगाबाद – औरंगाबाद ते पैठण एनएच क्रमांक 752-ई चे रुंदीकरण बारा वर्षांपासून रखडले होते. त्याला आता मुहूर्त लागणार आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते 24 एप्रिलला रुंदीकरण कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. यासाठी 900 ते 1000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी लवकरच अधिसूचना निघणार आहे.
सन 2010 मध्ये पीडब्ल्यूडी कडून 300 कोटींतून रस्ता केला जाणार होता. नंतर राज्य रस्ते विकास महामंडळाने त्या मार्गासाठी डीपीआर तयार केला. मग एनएचआयकडे कामाची जबाबदारी देण्यात आल्याने पुन्हा एबीसीडी असा प्रवास सुरु झाला.
या रस्त्याचे डांबरीकरण आतून चौपदरीकरण होईल. नक्षत्रवाडी, गेवराई तांडा येथे उड्डाणपूल सर्विस रोड होईल. दिल्लीच्या इजीस इंटरनॅशनलने डीपीआरचे काम केले. एप्रिल मध्ये भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. अशी माहिती एनएचआयच्या वतीने देण्यात आली आहे.