पत्नीने पतीला चहातून दिले विष; ‘त्या’ गंभीर अवस्थेतही बायकोसाठी गहिवरला तरुण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेने आपल्या पतीच्या चहात विष घातले. पतीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत अवैध संबंध होते. यासाठी पत्नीने आपल्या पतीला मार्गातून हटवण्यासाठी हत्येचा कट रचला.

काय आहे प्रकरण ?
ही घटना छतरपूर जिल्ह्यातील लवकुशनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या प्रमोद विश्वकर्माने सांगितले कि, त्याची पत्नी सुधा विश्वकर्मा हिचे संतोष विश्वकर्मा याच्यासोबत प्रेमसंबंध आहेत आणि दोघांना मी अनेकदा आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. यानंतर त्याने आपल्या पत्नीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती असे पीडित प्रमोदने सांगितले.

प्रमोदने आपल्या पत्नीच्या कृत्याची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली. त्यांनीदेखील तिला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला पण तिने काही ऐकले नाही. पीडित तरुणासोबत राहायचं नसल्याचं सांगून आरोपी पत्नीचे विवाहबाह्य संबंध सुरूच होते. मात्र एवढे होऊनही पीडित तरुणाला आपल्या पत्नीला सोडण्याची इच्छा नाही. त्यांच्या या लग्नाला 8 ते 9 वर्षे झाले आहेत. याशिवाय त्यांना दोन मुलेदेखील आहेत. यामुळे पीडित तरुण आपल्या पत्नीची समजूत काढत होता. यामुळे आरोपी पत्नीने चहामध्ये विष टाकून आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा पतीने केला आहे. मात्र तरीदेखील पीडित तरुण आपल्या पत्नीला सोडू इच्छित नाही.