औरंगाबाद- रेल्वेच्या धडकेत झालेल्या अपघातात एका 25 ते 30 वयोगटातील अज्ञात तरुण ठार झाल्याची घटना रविवारी (दि.३०) रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास छावणी परिसरातील ओव्हरब्रिज जवळील पटरीवर घडली. पोलीसाकडून तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास रक्ताने माखलेल्या अवस्थेत तरुण रेल्वे रुळावर पडल्याची माहिती छावणी पोलिसांना मिळाली होती.पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत.जखमी तरुणाला घाटी रुग्णालयात हलविले मात्र तो पर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.या प्रकरणी छावणी पोलीस ठण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास साह्ययक पोलीस उप निरीक्षक सुरेश जिरे करित आहे.
असे आहे मृताचे वर्णन
मृत तरुण हा रंगाने काळा सावळा, केस काळे,धाडी-मिशी बारीक,अंगात केशरी शर्ट व काळी पॅन्ट परिधान केलेली होती.तर पायात काळ्या रंगाची सॅंडल आहे. आशा वर्णनाच्या तरुणास ओळखणाऱ्या व्यक्तीने छावणी पोलीस ठाण्यास संपर्क साधावा असे आवाहन साह्ययक फौजदार सुरेश जिरे यांनी केले आहे.