म्हणून पत्नीच्या हातून झाला पतीचा खून

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वाई । प्रतिनिधी

दररोज दारू पिऊन भांडण करणाऱ्या पतीचा त्याच्याच पत्नीने चांगलाच बदला घेतला आहे. काल सोमवारी रात्री दारू पिऊन आलेल्या पतीच्या डोक्यात पत्नीने फारशी घातल्याने रात्रभर रक्तस्त्राव होऊन पतीचा मृत्यू झाला आहे. संजय विष्णू कांबळे असे मृत पतीचे नाव असून त्याच्या डोक्यात पत्नी सुलोचना हिने फारशीने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

आनेवाडी ता.वाई जिल्हा सातारा या गावी राहणाऱ्या संजय कांबळे आणि सुलोचना कांबळे या पति-पत्नीत दारूच्या व्यसनामुळे सतत वाद होत असत. पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्यास असणारे हे कुटुंब दारूमुळे दारिद्रयाचे जिणे जगत आहे. सोमवारी रात्री देखील संजय दारू पिऊन आला होता. त्याने बायकोला उठवण्यासाठी दरवाजा वाजवला. बायको बाहेर येताच दोघांमध्ये कडाक्याची भांडणे झाली. शाब्दिक वादावादीचे रूपांतर मारामारीत झाल्यानंतर पत्नी सुलोचना हिने नवऱ्याच्या डोक्यात फारशी मारली. यात पती संजयच्या डोक्यातून रात्रभर रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

विभागाचे पोलीस उपाधीक्षक यांनी घटना स्थळाला भेट दिली असून पोलीस उपनिरीक्षक अमृता राजपूत पुढील तपास करत आहेत. तसेच या खून प्रकरणातील आरोपी असणाऱ्या सुलोचना कांबळे हिला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.