चाकू ने भोसकून पत्नीने केली पतीची हत्या

प्रातिनिधिक छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी। घरगुती वादानंतर पत्नीने धारदार चाकूने भोसकून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. औरंगाबाद शहरात उल्कानगरी भागातील खिवांसरा पार्क येथे आज पहाटे वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. शैलेंद्र शिवसिंग राजपूत असे मृत पतीचे, तर पूजा शैलेंद्र राजपूत असे पतीची हत्या करणाऱ्या पत्नीचे नाव आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्रीच्या सुमारास पूजा आणि शैलेंद्र या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यांत पत्नीने रागाच्या भरात शैलेंद्रच्या जांगेत किचनमधील चाकू खूपसला. गंभीर घाव घातल्याने प्रमुख नस कापल्या गेल्याने अतीरक्तस्राव होऊन शैलेंद्रचा जागीच मृत्य झाला.

सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार या दांपत्याच्या लहान मुलीने रक्ताच्या थारोळ्यात घराच्या फरशीवर पडलेल्या शैलेंद्रला उठविण्याचा अतोनात प्रयत्न केला मात्र शैलेंद्र काही उठत नसल्याने चिमुकलीने काकाला फोन करून ‘पप्पा को चाकू मारा, पप्पा उठ नही रहे’ असे सांगितले त्यावरून नातेवाईकांनी जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना सोबत घेऊन शैलेंद्रचे घर गाठले त्यानंतर घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला. सदर घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शैलेंद्रची पत्नी पूजाला पोलिसांनी ताब्यात घेतले. हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू अद्याप पोलिसांना सापडलेला नसून त्याचा शोध सुरू आहे.

मयत शैलेंद्र हा उद्योजक होता. शैलेंद्र-पूजा यांनी प्रेमविवाह केला होता.त्यांना दोन मुली आहेत. राजपूत दांपत्यात घरगुती कारणावरून सतत भांडण होत होते. पत्नी पूजाने शैलेंद्रच्या आई विरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. सयुंक्त कुटुंबात राहणे आरोपी पूजाला आवडत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत. पत्नीच्या आग्रहाखातर शैलेंद्र पैठण रोडवरील बंगला सोडुन चार महिन्यापूर्वी खिवंसरा पार्क येथील मित्राच्या घरात भाड्याने राहत होते.