आज Covaxin ला WHO कडून मंजुरी मिळणार का ? संघटनेचे प्रवक्ते काय म्हणाले जाणून घ्या

नवी दिल्ली । भारताच्या स्वदेशी लस Covaxin ला मान्यता देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO) आज बैठक घेत आहे. आजच्या बैठकीच्या आधारेच Covaxin ला मंजुरी दिली जाणार आहे. संस्थेच्या प्रवक्त्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितले की, तांत्रिक सल्लागार गटाची बैठक सुरू आहे. त्याच्या इमर्जन्सी युझ लायसन्सवर (EUL) लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.

यापूर्वी, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले होते -‘ WHO कडे एक सिस्टीम आहे ज्यामध्ये एक तांत्रिक समिती आहे ज्याने लसीला मान्यता दिली आहे. इतर समित्यांची बैठक आज आहे. आजच्या बैठकीच्या आधारेच Covaxin ला मान्यता दिली जाईल. ‘

यापूर्वी 18 ऑक्टोबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले होते की, भारत बायोटेक ही लस उत्पादक कंपनी सातत्याने WHO कडे डेटा सादर करत आहे आणि WHO तज्ञांनी या डेटाचे पुनरावलोकन केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले होते की,’आम्हाला कंपनीकडून आणखी काही आणखी माहितीची अपेक्षा आहे.’

मंजुरीचा मोठा प्रभाव पडेल, परदेश प्रवासात सहजता येईल
या बैठकीत या लसीला मंजुरी मिळाल्यास देशात ही लस घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वास्तविक, WHO च्या या मंजुरीनंतर, Covaxin द्वारे लसीकरण करणार्‍यांना परदेशात प्रवास करताना खूप आराम मिळेल.

सुरुवातीपासूनच Covaxin हा भारताच्या लसीकरण कार्यक्रमाचा एक भाग आहे
सुरुवातीपासूनच Covaxin हा भारताच्या लसीकरण कार्यक्रमाचा एक भाग आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाचा, 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण कार्यक्रमात, Covishield आणि Covaxin ला आपत्कालीन वापरासाठी मंजूर करण्यात आले होते. तथापि, गेल्या काही महिन्यांत, सीरम इन्स्टिट्यूटच्या Covishield चा देशात लसीकरणात सर्वाधिक वाटा आहे. आता Covaxin चे उत्पादनही मोठ्या वेगाने वाढले आहे.