पुणे- नागपुरात हवेत उडणारी बस धावणार? गडकरींच्या ‘त्या’ ट्विटने आशा वाढली

Sky Bus Gadkari
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत जग खूप पुढे गेलं असून नवनवीन शोध लावण्याचा प्रयत्न सातत्याने सुरूच असतो. खास करून ऑटोमोबाईल क्षेत्रात माणसाने मोठी प्रगती केली आहे. आत्तापर्यन्त आपण इलेक्ट्रिक गाड्या बघितल्या, काही ठिकाणी ट्राफिकवर उपाय म्हणून हवेत उडणाऱ्या कार सुद्धा लाँच झाल्या? पण हवेत उडणारी बस (Flying Bus) सुद्धा अस्तित्वात येईल असा विचार तुम्ही कधी केलाय का? नक्कीच नसेल. पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या एका ट्विटमुळे आता हवेत उडणारी बस सुद्धा याची देही याची डोळा पाहायला मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

नितीन गडकरी नेहमीच भारतात हवेतून चालणाऱ्या बसेस आणण्याच्या गोष्टी करतात . परंतु त्याबद्दल जगात हे तंत्रज्ञाना कुठे विकसित झाले आहे याबाबत सुद्धा ते नेहमी लक्ष ठेऊन असतात. नुकतंच प्राग दौऱ्यावरून परतत असताना गडकरींनी संयुक्त अरब अमिराती (UAE) येथील शारजाह या शहरांत जाऊन हवेत चालणाऱ्या बसेस बद्दल आणि uSKY नावाच्या कंपनीने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती जाणून घेतली तसेच त्या तंत्रज्ञानाची चाचणी देखील घेतली आहे. यानंतर भारतातही हवेत उडणाऱ्या बस साठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

याबाबत गडकरी यांनी ट्विट करत म्हंटल कि, प्रागहून भारताच्या भेटीदरम्यान, शारजाह, UAE मधील U-Sky तंत्रज्ञानाच्या पायलट प्रमाणपत्र आणि अनुभव केंद्राला भेट दिली. यावेळी फ्लाइंग बस (स्काय बस) च्या डेमोचा अनुभव घेतला आणि या हवेत उडणाऱ्या बसची चाचणी केली. स्काय बस एक शाश्वत बस असून यामुळे गर्दी मुक्त शहर करण्यासाठी गतिशीलता मिळेल. हे तंत्रज्ञान बेंगळुरू, पुणे, नागपूर आणि दिल्ली या भारतीय शहरांमध्ये प्रभावी ठरेल आणि ते लवकरच भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असेही गडकरी यांनी म्हंटल.