हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या बांधवांच्या वारसदाराला नोकरी देण्याची घोषणा मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मी बोलणार आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अनेक तरुणांनी बलिदान दिलं होतं. त्यांच्या वारसांना नोकरी देखील मिळणं गरजेचं असल्याचं राजेश टोपे म्हणाले. वारसांना फक्त महामंडळात नोकरी न देता गुणवत्तेच्या आधारावर योग्य नोकरी देण्यात यावी, असं राजेश टोपे म्हणाले
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने नोव्हेंबर महिन्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनात बलिदान देणाऱ्या युवकांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत दिली आहे. त्यानंतर आता बलिदान देणाऱ्या वारसदारांना नोकरी देण्याची घोषणा राजेश टोपे यानी केल्यानंतर त्यांना न्याय मिळण्यास मदत होईल.