ठाकरे बंधू एकत्र येणार का? शर्मिला ठाकरेंच्या उत्तराने चर्चाना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठं भगदाड पडलं असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकटे पडले आहेत. अशा वेळी मनसे – शिवसेना यांनी एकत्र यावं असा सुरु काही राजकीय कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं होत. याबाबत खुद्द राज ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी दिलेल्या उत्तराने पुन्हा एकदा राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

आज पुण्यात “गणपती आमचा किंमत तुमची 2022 या मनसेने केलेल्या आयेजित उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी पत्रकारांनी शर्मिला ठाकरे यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकत्र येणार का यावर प्रश्न विचारला. यावेळी त्या म्हणाल्या साद घातली तर येऊदेत. मग बघू त्यानंतर,… शर्मिला ठाकरे यांच्या या विधानाने खरंच भविष्यात शिवसेना- मनसे एकत्र येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. मशिदीवरील भोंग्यावरूनही त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत रान उठवलं होत. त्यानंतर त्यांची भाजपशी जवळीकही वाढल्याचे दिसले. मात्र आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज ठाकरे -उद्धव ठाकरे एकत्र येणार का अशा चर्चा अधून मधून रंगत असतात. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते त्यामुळे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का हे आता पाहावं लागेल