एसटी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ कायद्याद्वारे कारवाई होणार का?? अनिल परब म्हणतात…

0
97
anil parab
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी कर्मचाऱ्यांचे सरकार मध्ये विलनिकरण व्हावं यासाठी राज्यभर कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला आहे. सरकार कडून भरगोस पगारवाढ करूनही तब्बल 1 महिना उलटून देखील कर्मचारी कामावर गेले नाहीत. त्यामुळे आज या कर्मचाऱ्यांना मेस्मा लागणार का? असा प्रश्न निर्माण झाला असून परिवहन मंत्री अनिल परब यांनी सूचक इशारा दिला आहे.

आज याबाबत बैठक होणार असून एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्याद्वारे कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. मेस्मा कसा लावायचा किंवा आणखी काय करायचं ते पाहू. मेस्मा कुणाला लावायचा हे चर्चेअंतीच ठरवलं जाईल, असं अनिल परब म्हणाले.

ते पुढे म्हणाले, संपाचा तिढा कायम आहे. कामगारांसाठी ज्या गोष्टी करणं शक्य होतं ते सर्व केलं आहे. सर्वाधिक पगारवाढ दिली आहे. पगार वेळेत देण्याची हमी घेतली आहे. तरीही कामगार भरकटलेले आहेत त्यांना वाटतं ताबडतोब आपला निकाल लागेल. पण कोर्टाने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. त्यामुळे सरकार निर्णय घेऊ शकत नाही असे अनिल परब यांनी म्हंटल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here